अधिवक्ता महमूद प्रचा यांच्या कार्यालयावर पोलिसांची धाड

देहली दंगलीतील आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी त्यांनी खोट्या प्रतिज्ञापत्राद्वारे या आरोपीला खोटी जबानी देण्यास बाध्य केले. तसेच अन्य एका अधिवक्त्याच्या हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले जो ३ वर्षांपूर्वीच मृत पावला होता.

बांगलादेशात फाशी ठोठावलेल्या गुन्हेगाराला १० वर्षांनंतर देहलीत अटक !

बांगलादेशातील गुन्हेगार हे घुसखोरी करून भारतात येऊन लपून रहातात; मात्र भारतीय सुरक्षायंत्रणा आणि पोलीस झोपलेले असल्याने त्यांचे फावते, हेच यातून लक्षात येते ! घुसखोरांसह अशांवरही कारवाई आवश्यक !  

उत्तरप्रदेशात एका मासात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याच्या अंतर्गत ३५ जणांना अटक !

एका राज्यात केवळ एका मासात ३५ जणांना अटक होते, याचा अर्थ हे लोण किती मोठ्या प्रमाणात पसरले आहे, हे लक्षात येते. केंद्र सरकारने लवकरात लवकर देशस्तरावर असा कायदा करून हिंदु तरुणींना न्याय द्यावा, अशीच हिंदूंची अपेक्षा !

अमली पदार्थांसह ३ जण आणि मर्सिडीस गाडी घेतली कह्यात

गुन्हे अन्वेषण विभागाने दोनापावला येथे धाड टाकून मुंबईस्थित स्ट्रोमे कॅनडी आणि व्हेलेंटाईन परेरा, तसेच भाग्यनगरस्थित आयन अली खान यांना ८ लाख ५० सहस्र रुपये किमतीच्या अमली पदार्थांसह कह्यात घेतले आहे.

राज्यातील कारागृहातील अपप्रकार रोखण्यासाठी ‘ड्रोन’ यंत्रणा कार्यान्वित केली जाणार ! – सुनील रामानंद, अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह)

गुन्हेगारांना सुधारण्यासाठी असणार्‍या यंत्रणेवरच लक्ष ठेवण्यासाठी जर ‘ड्रोन’चा वापर करावा लागणार असेल, तर यंत्रणेसाठी यापेक्षा दुर्दैव ते काय ?

अनधिकृतपणे वृक्षतोड करून जिल्हा परिषदेच्या भूमीवर पिकाची लागवड

अनधिकृतपणे वृक्षतोड करून तेथे पीक घेणार्‍या भाजप जिल्हाध्यक्षाच्या भावावर आणि एकावर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.

कळंबा कारागृहाच्या अधीक्षकांचे स्थानांतर

कळंबा कारागृहात अज्ञातांनी पाऊण किलो गांजा, १० भ्रमणभाष, २ ‘पेन ड्राईव्ह’, ४ ‘चार्जर कॉड’ आणि चिकटवण्यासाठी वापरण्यात येणारे मिश्रण फेकले होते.

महापालिकेच्या बेवारस वाहन जप्ती मोहिमेत आतापर्यंत ८१ वाहने जप्त

सांगली महापालिका क्षेत्रात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बेवारस वाहने पडून असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे

४९ दिवसांत गुन्हा न नोंदवल्याने देहली उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले !

मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेल्याचे प्रकरण : न्यायालयाने अशा पोलिसांना केवळ फटकारण्यासह कठोर शिक्षाही सुनवावी, अशी राष्ट्रप्रेमी नागरिकांची अपेक्षा आहे !

हत्येच्या प्रकरणातील आरोपीचे तिहार कारागृह परिसरातून अपहरण

देशातील प्रमुख अशा राजधानी देहलीतील या कारागृहामध्ये अशा प्रकारची घटना होणे कारागृह प्रशासनाला लज्जास्पद ! इथे असणारे जिहादी आतंकवादी आणि मोठे गुन्हेगार यांना कुणी अशा प्रकारे पळवून नेल्यास आश्‍चर्य वाटू नये !