केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतींवर लावण्यात आलेल्या सोन्याचे पितळेमध्ये रूपांतर झाल्याचा पुरोहितांचा आरोप !

बद्रीनाथ-केदानाथ मंदिर समितीने आरोप फेटाळले !

डॉ. रामोड यांच्‍या कुटुंबियांच्‍या खात्‍यात मिळाले ४७ लाख रुपये !

महामार्ग लगतच्‍या भूमी प्रकरणात सकारात्‍मक निकाल देण्‍यासाठी शेतकर्‍याकडून ८ लाख रुपयांची लाच स्‍वीकारणारे अप्‍पर विभागीय आयुक्‍त डॉ. अनिल रामोड आणि त्‍यांच्‍या कुटुंबातील सदस्‍य यांच्‍या अधिकोशातील १७ खाती केंद्रीय गुन्‍हे अन्‍वेषण विभागाने पडताळली असून या खात्‍यांमध्‍ये सीबीआयला ४७ लाख रुपये मिळाले आहेत.

जत (तालुका सांगली) तलाठी संघटनेच्‍या अध्‍यक्षांवर दुसर्‍यांदा लाच घेतांना गुन्‍हा नोंद !

प्रशासनात ग्रामसेवकापासून उच्‍चपदस्‍थ अधिकार्‍यांपर्यंत भ्रष्‍टाचार मुरला आहे. साधी कामे करण्‍यासाठीही जनतेकडून लाच घेतली जाते, हे गंभीर आहे. स्‍वातंत्र्यानंतरच्‍या ७५ वर्षांत एकही राजकीय पक्ष देश भ्रष्‍टाचारमुक्‍त करू शकलेला नाही. त्‍यामुळे भ्रष्‍टाचार्‍यांच्‍या एवढेच तो न रोखणारेही दोषीच आहेत !

ठाणे विभागात साडेपाच मासांत लाचखोरीचे ५० गुन्‍हे !

या गुन्‍ह्यांत सरकारी विभागातील अधिकार्‍यांसह एकूण आरोपींची संख्‍या ७० आहे. एकाही गुन्‍ह्यामध्‍ये न्‍यायालयात दोषारोपपत्र प्रविष्‍ट करण्‍यात आलेले नाही. ४९ गुन्‍हे हे तपासाधीन आहेत. गेल्‍या वर्षीपेक्षा ही संख्‍या ११ ने वाढली आहे.

एका वृत्तवाहिनीच्‍या संचालकाच्‍या विरोधात खंडणीचा गुन्‍हा नोंद !

नाशिक जिल्‍हा बँकेच्‍या कर्ज घोटाळ्‍याप्रकरणी माजी संचालक गणपतराव पाटील यांच्‍याकडून एका वृत्तवाहिनीच्‍या संचालकाने ६० सहस्र रुपयांची खंडणी मागितल्‍याची तक्रार

उरण (नवी मुंबई) पोलीस ठाणे येथील लाचखोर पोलीस उपनिरीक्षक कह्यात

अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्‍त करून त्‍यांना कठोर शिक्षा करायला हवी !

छत्रपती संभाजीनगर-पैठण रस्‍त्‍याच्‍या कामात गडबड करणार्‍या कंत्राटदाराला रगडून टाकीन ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

छत्रपती संभाजीनगर-पैठण रस्‍त्‍याच्‍या कामावर पत्रकारांनी लक्ष ठेवावे. काहीही गडबड झाल्‍यास मला कळवावे. संबंधित कंत्राटदारावर आमच्‍याकडून कडक कारवाई करण्‍यात येईल. त्‍याला रगडून टाकायचे काम मी करीन, असे प्रतिपादन केंद्रीय रस्‍ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत केले.

भारतीय सैन्यात पाकिस्तानी नागरिक नोकरी करत असल्याचा आरोप !

सैन्य छावणीत जयकांत कुमार आणि प्रद्युम्न कुमार हे पाकिस्तानी नागरिक नोकरी करत असल्याचे समोर आले. दोघांनी सैन्याची नोकरी मिळण्याच्या परीक्षेमध्येही बनावट कागदपत्रे सादर केल्याचे बोलले जात आहे.

लेखापरीक्षण अहवाल सादर न करणार्‍या क्रीडा अधिकार्‍यांना तत्परतेने तो सादर करण्याचा आदेश !

अनेक क्रीडासंकुले आणि क्रीडा परिषदा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल शासनाला सादर करत नाहीत. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार किंवा भ्रष्टाचार होण्याची शक्यता वर्तवत हिंदु विधीज्ञ परिषदेने राज्याच्या क्रीडा संचालकांकडे लेखी तक्रार केली होती.

औरंगजेब हा काही लोकांना आताच माहीत झाला का ? – सत्‍यजीत तांबे, आमदार

औरंगजेबाचे चित्र अचानक झळकण्‍याला राजकीय वास असून अशा प्रकारचे प्रयोग हे कर्नाटक निवडणुकीपूर्वी झालेले आहेत. तरुणांनी आता जागे व्‍हावे, चांगले काय, वाईट काय ? ते बघावे, असे आवाहन त्यांनी ९ जून या दिवशी नाशिक येथे केले.