(म्हणे) ‘पाकिस्तान नाही, तर चीन भारताचा खरा शत्रू !’  

पाक असो कि चीन दोघेही भारताचे शत्रू आहेत; मात्र मुसलमानांच्या मतांसाठी समाजवादी पक्ष पाककडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे, हे यातून स्पष्ट होते ! असा पक्ष सत्तेत आल्यास त्याने पाकच्या घुसखोरांना पायघड्या घातल्यास आश्‍चर्य वाटू नये !

सोव्हिएत संघाप्रमाणे चीनचे तुकडे होऊ शकतात !  

चीनच्या परराष्ट्र धोरणाविषयीचे सल्लागार जिया किंग्गुओ यांनी ‘चीनचे सोव्हिएत संघाप्रमाणे तुकडे होऊ शकतात’, अशी चेतावणी दिली आहे.

अरुणाचल प्रदेशामधून बेपत्ता झालेला मुलगा अंततः सापडला !

चिनी सैन्याने भारतीय सैन्याला दिली मुलाची माहिती !

चीनने अमेरिकेच्या विमानांच्या फेर्‍या रहित केल्यानंतर अमेरिकेकडून चिनी विमानांच्या फेर्‍या रहित !

चीनने कोरोना निर्बंधांचे कारण पुढे करत अमेरिकेला जाणार्‍या काही विमानांच्या फेर्‍या स्थगित केल्या. यानंतर अमेरिकेनेही चीनच्या ४ विमान आस्थापनांच्या अमेरिकेहून चीनला जाणार्‍या ४४ फेर्‍या रहित करण्याचा निर्णय घेतला.

अपहरणकर्ता चीन !

भारत सरकारने आता या घटनेच्या निमित्ताने चीनला कुटनीती किंवा सर्जिकल स्ट्राईक यांसारख्या काही अन्य उपाययोजना काढून चीनला चांगलाच धडा शिकवायला हवा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही हे सूत्र नेऊन वाचा फोडायला हवी.

चिनी सैन्याकडून अरुणाचल प्रदेशमध्ये घुसून १७ वर्षीय मुलाचे अपहरण !

‘चीन सीमेवर भारताचे राज्य आहे कि चीनचे ? येथे भारतीय सैन्य काय करत होते ?’ असे प्रश्‍न उपस्थित होतात. चीन सातत्याने अरुणाचल प्रदेशवर स्वतःचा दावा करत असतांना अशा प्रकारचा निष्काळजीपणा सैन्याला लज्जास्पद !

मुक्त पत्रकार राजीव शर्मा याने चिनी गुप्तहेरांना भारताची गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवल्याचे उघड !

देशाच्या सुरक्षेशी खेळणार्‍या अशा पत्रकारांना सरकारने ‘देशद्रोही’ घोषित करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे !

चीनचे नियंत्रण रेषेवर ६० सहस्र सैन्य तैनात आणि भारताचे प्रत्युत्तर !

आपण ही हायब्रिड वार, सायबर वॉर अन् आर्थिक युद्ध यांविरोधात चीनला वेळोवेळी प्रत्युतर दिले पाहिजे. या लढाईत देशभक्त नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा ! भारतियांनी चिनी वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कार घालणे आवश्यक आहे.

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : २८.१०.२०१८

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत

भूतानच्या प्रदेशात चीनकडून गावांची उभारणी !

भूतानच्या प्रदेशात अवैध बांधकामे करून तेथे चिनी सैनिकांना घुसवणे आणि त्याद्वारे भारतावर दबाव आणण्याचा चीनचा डाव आहे ! हा डाव हाणून पाडण्यासाठी आता भारताने आक्रमक धोरण अवलंबणे आवश्यक !