अरुणाचल प्रदेशामधून बेपत्ता झालेला मुलगा अंततः सापडला !

चिनी सैन्याने भारतीय सैन्याला दिली मुलाची माहिती !

अरुणाचल प्रदेशातून अपहरण झालेला मीराम तारोन

ईटानगर (अरुणाचल प्रदेश) – अरुणाचल प्रदेशातून अपहरण झालेला १७ वर्षीय मीराम तारोन हा मुलगा अंततः सापडला आहे. चिनी सैन्याने भारतीय सैन्याला त्याची माहिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून भारतीय सैन्य या तरुणाचा शोध घेत होते. प्रारंभी चिनी सैनिकांनी या मुलाविषयी काहीही माहिती नसल्याचे सांगितले होते; मात्र आता चिनी सैनिकांनी भारतीय सैन्याला सांगितले, ‘त्यांच्या भागात एक मुलगा सापडला आहे.’ आता त्याला परत भारतात आणण्याची प्रक्रिया चालू आहे.