छत्रपती शिवरायांच्या प्रेरक शक्ती जिजाऊमाता !

वर्ष १५९५ मध्ये विदर्भातील सिंदखेडराजा येथे जिजाबाईंचा जन्म झाला. त्या शहाजीराजांची पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता होत्या. जिजाऊंमुळे महाराष्ट्राला छत्रपती शिवराय लाभले आणि त्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.

राष्ट्र आणि धर्माभिमानी बालके हवीत !

‘बालसंस्कार’ विषय आल्यावर राष्ट्राचे भावी नागरिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ‘बालक-युवक सक्षम, तर राष्ट्र सक्षम’ असा सरळ संबंध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणी त्यांच्या वीरमाता जिजाबाई यांनी त्यांच्यावर रामायण-महाभारत यांतील कथा सांगून संस्कार केले.

छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून पुढील पिढीला सुरक्षित वातावरण निर्माण करून देणे आपले धर्मकर्तव्य ! – विपुल भोपळे, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून हिंदूंना सुरक्षित केले. त्यांना स्वाभिमान मिळवून दिला. याचाच आदर्श घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होऊन पुढच्या पिढीला सुरक्षित आणि स्वाभिमानी वातावरण निर्माण करून देणे, हे आपले धर्मकर्तव्य आहे.

क्षेत्र चाफळ येथे ‘श्री शिवराज्‍याभिषेकदिन’ उत्‍साहात साजरा !

श्रीक्षेत्र चाफळ येथे हिंदु एकता आंदोलन आणि श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ३५० वा ‘श्री शिवराज्‍याभिषेकदिन’ मोठ्या उत्‍साहात साजरा करण्‍यात आला.

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करावे !

हिंदु जनजागृती समितीची महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे मागणी !

रत्नागिरी जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या धर्मांधाला अटक !

अशा गोष्टींसाठी पोलिसांना निवेदन द्यावे का लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ? ‘निवेदन दिले नसते, तर पोलीस गप्पच बसले असते’, असेच हिंदूंना वाटते !

श्रीक्षेत्र चाफळ येथे ‘श्रीशिवराज्याभिषेकदिन’ उत्साहात साजरा !

सायंकाळी श्रीक्षेत्र चाफळ गावातून छत्रपती शिवरायांची पालखीमधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला गावातील माता-भगिनी, युवक, युवती आणि ज्येष्ठ शिवभक्त उत्साहाने सहभागी झाले.

युगकर्ते छत्रपती शिवाजी महाराज !

छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले ‘स्वराज्य’, म्हणजे एखादा राजकीय पक्ष काढण्यासारखे नव्हते, तर त्यामध्ये ‘सर्वसामान्यांपासून प्रत्येक स्तरावरच्या व्यक्तीला आपले वाटेल’, असे प्रजेचे ते राज्य होते आणि ते ज्या परिस्थितीमधून उभे राहिले, त्याला ‘एका नव्या युगाचा आरंभ’ असे म्हटले गेले.

इयत्ता चौथीनंतरही छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकवला जावा, हे प्रशासनाला स्वतःला का कळत नाही ?

शालेय जीवनात इयत्ता चौथीनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकवला जात नाही. त्यामुळे पुढच्या पिढीला शिवाजी महाराज कळत नाहीत. इतिहास विसरलो, तर आजच्या तरुणांना स्वतःचे भविष्य निर्माण करणे कठीण होईल.

पिंपरी-चिंचवड शहराचे ‘जिजाऊनगर’ नामकरण करण्‍याच्‍या मागणीसाठी १०० हून अधिक ‘होर्डिंग्‍ज’ !

छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या ३५० व्‍या राज्‍याभिषेकदिनाचे औचित्‍य साधत पिंपरी-चिंचवड शहराचे ‘जिजाऊनगर’ नामकरण करण्‍याची मागणी करण्‍यात आली आहे.