पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा नष्ट करून नवीन गोवा सिद्ध करा !

बेतुल किल्ल्यावर ६ जून या दिवशी आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे आवाहन केले.

शासन शिवरायांच्‍या युद्धकलेचे संग्रहालय उभारणार ! – मंगलप्रभात लोढा, पर्यटनमंत्री

महाराष्‍ट्र शासनाच्‍या पर्यटन विभागाने गोराई येथील महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळाच्‍या १३६ भूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या युद्धकलेचे संग्रहालय उभारण्‍याचा निर्णय घेतला आहे. या संग्रहालयासाठी शासनाकडून ५० कोटी रुपये इतका निधी दिला जाणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

शिवराज्यभिषेकदिनी कोल्हापूर येथे धर्मांधांनी ठेवले टिपू सुलतान याच्या  समर्थनार्थ ‘स्टेटस’ !

हा हिंदूंना डिवचण्याचा आणि आक्रमकांचे उदात्तीकरण करण्याचाच प्रकार नव्हे का ? यातून त्यांचे हिंदूंविरुद्ध काही षड्यंत्र रचले जात नाही ना ?, याची पोलिसांनी चौकशी करणे आवश्यक आहे !

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार !

६ जून या दिवशी राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे समारंभपूर्वक या तिकिटाचे अनावरण करण्यात येणार आहे.

विशाळगड येथील छत्रपती शिवरायांची मूर्ती प्रशासनाने हटवली !

‘मराठा तितुका मेळवावा’ संघटनेच्या वतीने शिवराज्याभिषेकदिनाच्या निमित्ताने विशाळगड येथे पंत प्रतिनिधीच्या वाड्याच्या परिसरात ३ जूनच्या रात्री ९.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांची ५ फूट उंचीची फायबरची मूर्ती बसवण्यात आली होती.

अमरावती जिल्ह्यात विविध ठिकाणी शिवराज्याभिषेक दिन साजरा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ जून या दिवशी अमरावती जिल्ह्यातील नवाथे प्लॉट, देऊरवाडा आणि दर्यापूर येथे ३५० वा  शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

नंदुरबार येथे रणरागिणी शाखेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा !

२ जून या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने ३५० वा शिवराज्याभिषेक दिन करण्यात आला.

सातारा येथे मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेकदिन साजरा  !

श्री शिवराज्याभिषेकदिन उत्सव समिती आणि सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ३५० वा ‘शिवराज्याभिषेकदिन’ सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याची सांगता भव्य मिरवणुकीने झाली.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथे शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा !

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३५० वा शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

सातारा शहराचा ऐतिहासिक वारसा जपावा ! – शंभूराज देसाई

गांधी मैदान येथे श्री शिवराज्याभिषेकदिन उत्सव समिती आणि सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यामाने ३५० व्या श्री शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.