छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे ‘शिवशस्‍त्रशौर्य’ प्रदर्शनात पहाता येणार !

सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, नागपूर येथील मध्‍यवर्ती संग्रहालय, कोल्‍हापूर येथील ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ आणि मुंबईमधील ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्‍तूसंग्रहालय’ या ठिकाणी ही वाघनखे जनतेला पहाण्‍यासाठी ठेवण्‍यात येणार आहेत.

(म्हणे) ‘रामदास संत नव्हे, महाराष्ट्रातील जंत !’ – श्रीमंत कोकाटे

समर्थ रामदासस्वामी यांना जातीयवादी म्हणणारे आणि एकेरी संबोधणारे, हिंदु अन् ब्राह्मण द्वेष्टे श्रीमंत कोकाटे ! अन्य पंथियांमध्ये इतक्या खालच्या स्तराला जाऊन त्यांच्या श्रद्धास्थानांवर कुणी टीका केली, तर काय होते, याची सर्वांना कल्पना आहे ! हिंदु निद्रिस्त असल्यामुळेच कोकाटे यांच्यासारख्यांचे फावले आहे !

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे काम अंतिम टप्‍प्‍यात ! – तेजस गर्गे

आतापर्यंत दालनाचे अद्ययावतीकरण आणि रंगरंगोटीचे काम ८० टक्‍के पूर्ण झाले आहे. जानेवारी २०२४ पर्यंत हे काम पूर्ण होऊन संग्रहालय सातारावासियांच्‍या सेवेत रुजू होईल.

छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक वाघनखे सातारा येथे आणणार ! – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

वाघनखे वर्ष १८२४ मध्‍ये इंग्रजांनी लंडनला नेली. १९९ वर्षानंतर आता ही वाघनखे पुन्‍हा भारतात येणार आहेत. पुढील केवळ ३ वर्षे हा अनमोल ठेवा भारतात रहाणार आहे.

हिंसाचारात हिंदू एकता आंदोलनाचे विक्रम पावसकर यांचे नाव जाणीवपूर्वक गोवल्‍यास सकल हिंदु समाज रस्‍त्‍यावर उतरेल ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन

पुसेसावळी (जिल्‍हा सातारा) येथे ११ सप्‍टेंबरच्‍या रात्री झालेल्‍या हिंसाचारात सातारा येथील हिंदू एकता आंदोलनाचे जिल्‍हाप्रमुख श्री. विक्रम पावसकर यांचे नाव समाजकंटकांकडून अकारण गोवले जात आहे.

पुसेसावळी (जिल्‍हा सातारा) येथे संचारबंदी !

सामाजिक माध्‍यमांद्वारे कुणी आक्षेपार्ह लिखाण प्रसारित केले ? हे उघड असतांना त्‍याकडील लक्ष दुसरीकडे वळवण्‍यासाठी धर्मांध अकारण हिंदु जनआक्रोश मोर्चा आणि त्‍यात सहभागी हिंदु नेते यांवर आरोप करत आहेत ! धर्मांधांचा हा कावेबाजपणा लक्षात घ्‍या !

पुण्‍यातील तरुणांनी ‘पंचधातू’द्वारे सिद्ध केले ‘शिववस्‍त्र’ !

इंग्‍लंडमधील मराठी माणसांच्‍या पुढील पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळावेत, यासाठी हे ‘शिववस्‍त्र’ तेथील संग्रहालयात पहाण्‍यासाठी ठेवण्‍यात येणार आहे.

धर्मांधांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आक्षेपार्ह लिखाण केल्याने जमावाचा उद्रेक !

संतप्त जमावाने धर्मांधांच्या दुकानांची तोडफोड करून टपर्‍या जाळल्या. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यात संगणकीय ज्ञानजाल (इंटरनेट) सेवा बंद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री इंग्लंडला जाऊन ‘वाघनखे प्रत्यार्पण’ करारावर स्वाक्षरी करणार !

याच वाघनखांद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्याशी दगाफटका करणार्‍या अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता.

शिवरायांची वाघनखे १६ नोव्हेंबरला लंडनहून मुंबईत ! – मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढला ती वाघनखे लंडनमधील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट’ वस्तूसंग्रहालयात आहेत. ती महाराष्ट्रात आणण्यासाठी इंग्लंडसमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे.