पुसेसावळी (जिल्‍हा सातारा) येथे संचारबंदी !

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्‍याने जमावाचा उद्रेक झाल्‍याचे प्रकरण !

सातारा – पुसेसावळी (जिल्‍हा सातारा) येथे ११ सप्‍टेंबरच्‍या रात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या संदर्भात आक्षेपार्ह लिखाण केल्‍याने जमावाचा उद्रेक झाला. या उद्रेकात नूरहसन लियाक शिकलगार याचा मृत्‍यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी १९ जणांना अटक केली असून अनुमाने १०० संशयितांविरुद्ध गुन्‍हे नोंदवले आहेत. पुसेसावळीत संचारबंदी लागू करण्‍यात आली असून सातारा जिल्‍ह्यात १३ सप्‍टेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्‍यात आली आहे. ‘इंटरनेट’ सेवा बंद असल्‍यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे.

धर्मांधांकडून हिंदु जनआक्रोश मोर्चावर आरोप !

‘सातारा जिल्‍ह्यात झालेल्‍या जनआक्रोश मोर्चातील हिंदु नेत्‍यांमुळे हा उद्रेक झाला’, असा आरोप सातारा येथे काही धर्मांधांनी केला असून हिंदु नेत्‍यांवर कारवाई करण्‍याची मागणी केली आहे. (सामाजिक माध्‍यमांद्वारे कुणी आक्षेपार्ह लिखाण प्रसारित केले ? हे उघड असतांना त्‍याकडील लक्ष दुसरीकडे वळवण्‍यासाठी धर्मांध अकारण हिंदु जनआक्रोश मोर्चा आणि त्‍यात सहभागी हिंदु नेते यांवर आरोप करत आहेत ! धर्मांधांचा हा कावेबाजपणा लक्षात घ्‍या ! – संपादक)