धर्मांधांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आक्षेपार्ह लिखाण केल्याने जमावाचा उद्रेक !

दुकानांची तोडफोड, तसेच ‘इंटरनेट’ सेवा बंद

पुसेसावळी (जिल्हा सातारा) – येथे १० सप्टेंबरला सायंकाळी २ धर्मांधांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित केल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. यापूर्वीही राष्ट्रपुरुषांच्या अवमानाच्या घटना घडूनही प्रशासनाकडून योग्य ती नोंद घेतली गेली नसल्याने जमावाचा उद्रेक झाला.

संतप्त जमावाने धर्मांधांच्या दुकानांची तोडफोड करून टपर्‍या जाळल्या. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यात संगणकीय ज्ञानजाल (इंटरनेट) सेवा बंद करण्यात आली आहे. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे नोंदवले आहेत.

काही दिवसांपूर्वी पुसेसावळी येथे काही युवकांकडून वरील स्वरूपाचाच प्रकार घडला होता. तेव्हाही नागरिकांनी आंदोलन केले होते; मात्र तेव्हा प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही. हे प्रकरण धुमसत असतांनाच वरील घटना घडली.

नागरिकांनी शांतता आणि सामाजिक सलोखा राखावा ! – सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्‍हापूर परिक्षेत्र

खटाव तालुक्‍यातील पुसेसावळी येथील घटनेच्‍या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी शांतता आणि सामाजिक सलोखा राखावा. सामाजिक माध्‍यमांवर कोणतीही चुकीची माहिती प्रसारित करू नये, तसेच पोलीस आणि प्रशासन यांना सहकार्य करावे, असे आवाहन कोल्‍हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले. फुलारी यांनी औंध विश्रामगृह येथे परिस्‍थितीचा आढावा घेतला. या वेळी जिल्‍हाधिकरी जितेंद्र डुडी आणि जिल्‍हा पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्‍थित होते.

या मारहाणीमध्‍ये एकूण १० जण घायाळ असून त्‍यांच्‍यावर उपचार चालू आहेत. एक व्‍यक्‍ती उपचाराच्‍या कालावधीत मृत झाली आहे. या घटनेच्‍या अनुषंगाने औंध पोलीस ठाणे येथे २ स्‍वतंत्र गुन्‍हे नोंद करण्‍यात आले आहेत. आक्षेपार्ह लिखाणाच्‍या गुन्‍ह्याचे अन्‍वेषण औंध पोलीस ठाण्‍याचे साहाय्‍यक पोलीस निरीक्षक वाळवेकर करत आहेत, तर खुनाच्‍या गुन्‍ह्याचे अन्‍वेषण पोलीस निरीक्षक स्‍थानिक गुन्‍हे शाखा, सातारा हे करत आहेत. गुन्‍ह्याच्‍या अन्‍वेषणाच्‍या कालावधीत आतापर्यंत २३ आरोपींना कह्यात घेण्‍यात आले आहे, असे फुलारी यांनी सांगितले.

पुसेसावळी बंद, तर सातारा शहरासह जिल्‍ह्यात अघोषित बंदसारखी स्‍थिती !

या घटनेच्‍या पार्श्‍वभूमीवर ११ सप्‍टेंबरला पुसेसावळी बंद होते. शाळांना सुटी देण्‍यात आली होती. सातारा शहर आणि जिल्‍ह्यात अघोषित बंदसारखी स्‍थिती होती. ‘इंटरनेट’ सेवा बंद असल्‍याने शासकीय कार्यालयांसह बहुतांश व्‍यवहारही ठप्‍प होते, तसेच ‘गूगल पे’, ‘पे टीएम्’, तसेच अन्‍य ‘अ‍ॅप’ही बंद होते. त्‍यामुळे नागरिकांना ऑनलाईन व्‍यवहार करतांना अडचणी आल्‍या. सातारा शहरातही पोलीस बंदोबस्‍त वाढवण्‍यात आला असून पोलिसांनी अफवांवर विश्‍वास न ठेवण्‍याचे आवाहन केले आहे. कोल्‍हापूर येथूनही अतिरिक्‍त पोलीस कुमक मागवण्‍यात आली आहे.