वाघनखे भावी पिढीला शिवप्रतापाची प्रेरणा देतील ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे ब्रिटनमधून भारतात आणण्‍याच्‍या सामंजस्‍य करारावर ३ ऑक्‍टोबर या दिवशी लंडन येथील ‘व्‍हिक्‍टोरिया अँड अलबर्ट म्‍युझियम’मध्‍ये स्‍वाक्षरी झाली.

हिंदवी स्वराज्याच्या पराक्रमाचा इतिहास महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोचणार !

महाराष्ट्र शासनाचा अभिनंदनीय निर्णय !

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याचे रूपांतर आपल्याला रामराज्यात करायचे आहे ! – अभय जगताप

आजचा दिवस दसरा-दिवाळीसारखा उत्साहाचा दिसतो, ही किमया छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. आजपर्यंत देशावर अनेक आक्रमणे झाली. परकीय आक्रमकांना केवळ देशच लुटायचा नव्हता; तर देशातील धर्म, संस्कृती आणि धर्मनिष्ठ समाजजीवन नष्ट करायचे होते.

पोलिसांनी गुन्‍हा नोंदवतांना कठोर कलमे न लावल्‍याने हिंदुत्‍वनिष्‍ठ संतप्‍त !

हिंदुत्‍वनिष्‍ठांनो, संतप्‍त होऊन थांबू नका, तर संबंधित धर्मांधांवर कठोर कलमे लावण्‍यासाठी पोलीस प्रशासनाचा पाठपुरावा घ्‍या आणि राष्‍ट्रकर्तव्‍य पार पाडा !

शिवरायांनी वापरलेली वाघनखे भारतात आणण्‍याच्‍या करारावर आज स्‍वाक्षर्‍या होणार !

छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे इंग्‍लंड येथील ‘व्‍हिक्‍टोरिया अँड अलबर्ट म्‍युझियम’ मधून भारतात आणण्‍याच्‍या करारावर ३ ऑक्‍टोबर या दिवशी स्‍वाक्षर्‍या होणार आहेत. या करारासाठी सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार इंग्‍लंड येथे गेले आहेत.

सांगली जिल्‍ह्यातील अनेक गावांमध्‍ये ‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्ययात्रे’स प्रतिसाद !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या राज्‍याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होणे आणि विश्‍व हिंदु परिषदेच्‍या स्‍थापनेला ६० वर्षे पूर्ण झाल्‍याविषयी विश्‍व हिंदु परिषद अन् बजरंग दल यांच्‍या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्ययात्रेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘शिवशौर्य यात्रे’मुळे वातावरण शिवमय !

हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने ‘शिवशौर्य यात्रे’च्या सिंधुदुर्ग परिक्रमेला प्रारंभ करण्यात आला. तेथून यात्रेचे बांदा, सावंतवाडी, कुडाळ येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येऊन मालवण येथे सायंकाळी आगमन झाले.

राज्यात १ आणि २ ऑक्टोबरला परिसर अन् गड-दुर्ग स्वच्छता अभियान ! – मंत्री मंगल प्रभात लोढा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्याद्वारे १ ऑक्टोबर या दिवशी नजीकचा परिसर स्वच्छता आणि २ ऑक्टोबर या दिवशी राज्यातील गड-दुर्गांची स्वच्छता अभियान राबवण्यात येणार

‘हिंदु आणि हिंदुत्व, म्हणजे ‘वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि ’!

‘कट्टर हिंदु असूनही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात रहाणार्‍या अन्य धर्मियांना कधीही सापत्न (सावत्र) वागणूक दिली नाही. त्यांनी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा कधी अवमान केला नाही, ना त्यांची प्रार्थनास्थळे कधी उद्ध्वस्त केली.

सिंधुदुर्ग ते मुंबई ‘शिवशौर्य यात्रा’ : उद्या दोडामार्ग येथून प्रारंभ

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदूंनी मोठ्या संख्येने आणि पारंपरिक वेषात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.