हिंसाचारात हिंदू एकता आंदोलनाचे विक्रम पावसकर यांचे नाव जाणीवपूर्वक गोवल्‍यास सकल हिंदु समाज रस्‍त्‍यावर उतरेल ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन

पुसेसावळी (जिल्‍हा सातारा) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या संदर्भात आक्षेपार्ह लिखाण केल्‍याने जमावाचा उद्रेक झाल्‍याचे प्रकरण !

निवासी उपजिल्‍हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देतांना सकल हिंदू समाजाचे प्रतिनिधी

कोल्‍हापूर – पुसेसावळी (जिल्‍हा सातारा) येथे ११ सप्‍टेंबरच्‍या रात्री झालेल्‍या हिंसाचारात सातारा येथील हिंदू एकता आंदोलनाचे जिल्‍हाप्रमुख श्री. विक्रम पावसकर यांचे नाव समाजकंटकांकडून अकारण गोवले जात आहे. या प्रकरणी जर पोलीस प्रशासन हिंदूंना आणि हिंदु समाजाच्‍या प्रतिनिधींना प्रताडित करत असेल, तर महाराष्‍ट्रातील सकल हिंदु समाज रस्‍त्‍यावर उतरून या विषयावर आंदोलन करील, असे निवेदन कोल्‍हापूर जिल्‍हाधिकारी यांना सकल हिंदु समाजाच्‍या वतीने देण्‍यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्‍हाधिकारी संजय तेली यांनी स्‍वीकारले.

या प्रसंगी या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्‍यक्ष श्री. गजानन तोडकर, हिंदु महासभेचे जिल्‍हाप्रमुख श्री. मनोहर सोरप, श्री. नंदकुमार घोरपडे, श्री. राजू तोरस्‍कर, बजरंग दलाचे जिल्‍हा संयोजक श्री. पराग फडणीस, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे जिल्‍हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, कोल्‍हापूर शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, हिंदू युवा प्रतिष्‍ठानचे श्री. अशोक देसाई, हिंदु जनजागृती समितीचे  श्री. शिवानंद स्‍वामी आणि श्री.मधुकर नाझरे उपस्‍थित होते.

गेले कित्‍येक मास देवता आणि महापुरुष यांचा अपमान करणारे लिखाण सामाजिक माध्‍यमांवर केले जात आहे. याविरुद्ध पोलीस प्रशासनाकडे तक्रार केल्‍यावर कारवाई करण्‍यास टाळाटाळ केली जाते आणि आणि कारवाई केलीच, तर किरकोळ स्‍वरूपाची केली जाते. यामुळे समाजकंटक आणि गुन्‍हेगार अधिकच निर्ढावले आहेत. या लोकांना पोलिसांची, तसेच कायद्याची भीतीच उरलेली नाही. त्‍यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. परिणामी समाजात हिंदूंच्‍या भावना दुखावल्‍या जातात. पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई न झाल्‍यामुळेच हिंदूंकडून उद्रेक होत आहे. ‘अशा प्रकारच्‍या गुन्‍ह्यांचे आतंकवादाच्‍या दृष्‍टीकोनातून अन्‍वेषण करावे आणि त्‍याच अनुषंगाने गुन्‍हे नोंद करावे’, अशी मागणी आम्‍ही करतो.


सांगली येथे निवासी उपजिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन !

निवासी उपजिल्‍हाधिकार्‍यांना (उजवीकडे) निवेदन देतांना हिंदुत्‍वनिष्‍ठ

सांगली – वरील विषयाच्‍या संदर्भातील मागणीचे निवेदन हिंदू एकता आंदोलनाच्‍या वतीने सांगली येथे निवासी उपजिल्‍हाधिकार्‍यांना देण्‍यात आले. या प्रसंगी माजी आमदार श्री. नितीन शिंदे, हिंदू एकता आंदोलनाचे सर्वश्री संजय जाधव, किरण माळी, रमेश नाईक, संभाजी पाटील, अमित जाधव यांच्‍यासह अन्‍य उपस्‍थित होते.

संपादकीय भूमिका

हिंदूबहुल राज्यात हिंदूंना वारंवार रस्त्यावर उतरावे लागणे, हि स्थिती हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता दर्शवते !