देशाचा संसार चांगला होण्यासाठी आम्ही श्री दुर्गामातेकडे आशीर्वाद मागायला आलो आहोत ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

श्री दुर्गादेवी शिवछत्रपतींचे कार्य करण्यासाठी शक्ती, भक्ती आणि युक्ती आपल्याला देईल, असे प्रतिपादन पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.

छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख असणारा फलक पालटा ! 

उल्हासनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दिशा निर्देशक फलकावर ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ असे पूर्ण नाव न लिहिता ‘शिवाजी चौक’ असे लिहिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘देव, धर्म आणि देश’ रक्षणाचा आदर्श घेऊन नवा भारत बनवूया ! – डॉ. प्रमोद सावंत

अलीकडे इस्लामी जिहाद आणि वामपंथी देशद्रोही कारवाया करत आहेत. सेवा आणि शिक्षण यांच्या आडून धर्मांतर केले जात आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारधारा पुढे नेऊन हिंदुत्व अखंड ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.

‘शिवशौर्य यात्रे’च्‍या माध्‍यमातून तरुणांमध्‍ये शौर्य जागृतीचे कार्य ! – गणेश नाईक, आमदार, भाजप

‘शिवशौर्य यात्रे’च्‍या माध्‍यमातून तरुणांमध्‍ये शौर्य जागृतीचे कार्य होत आहे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी वाशी येथे केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या राज्‍याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत.

सिंधुदुर्ग : राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारणीच्या कामाला वेग

राज्यशासन आणि नौदल यांनी निश्चित केलेल्या भूमीवर पुतळा उभारणी अन् सुशोभीकरण यांचे काम चालू ! या अनुषंगाने नौसेनेचे वेस्टर्न नेव्हल कमांड चीफ ऑफ स्टाफ व्हॉईस ॲडमिरल संजय भल्ला यांनी राजकोट किल्ल्याची पहाणी केली.

हिंदु, हिंदुत्व आणि अपघाताने जन्मलेले हिंदू

हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी – भाग ११ ‘हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी’ या लेखमालिकेतील यापूर्वीच्या लेखांचे वाचन केल्यानंतर हिंदु आणि हिंदुत्व म्हणजे काय ? याची बरीचशी कल्पना वाचकांना निश्‍चितपणे आली असेल. ज्या हिंदूंमध्ये लेखात वर्णित केल्याप्रमाणे हिंदुत्वाचे गुणधर्म आहेत, त्यालाच हिंदुत्वनिष्ठ म्हणता येईल. हिंदु धर्मात जन्म झाला म्हणून कुणी हिंदुत्वनिष्ठ होत नाही. हिंदुत्वनिष्ठ होण्यासाठी … Read more

‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रे’मध्‍ये मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हा ! – सकल हिंदु समाजाचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्‍थापन केलेल्‍या हिंदवी स्‍वराज्‍यास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्‍यासाठी विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दलाच्‍या वतीने आयोजित राष्‍ट्रव्‍यापी शौर्य जागरण यात्रा देशाचे सशक्‍तीकरण करण्‍याच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत महत्त्वाची आहे.

विहिंप-बजरंग दल यांच्‍या वतीने कोल्‍हापुरात ‘शौर्य जागरण यात्रा’ !

छत्रपती शिवरायांनी स्‍थापन केलेल्‍या हिंदवी स्‍वराज्‍यास ३५० वर्षे होत आहेत. त्‍याचसमवेत विश्‍व हिंदु परिषदेच्‍या कार्यास ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्‍याचे औचित्‍य साधून विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्‍या वतीने देशभर ‘शौर्य जागरण यात्रा’ चालू आहेत.

भारतात हिंदू बहुसंख्य असतांनाही त्यांची मानसिकता अल्पसंख्यांकांप्रमाणे ! – फ्रान्सुआ गोतिए, फ्रेंच पत्रकार

जे एका विदेशी पत्रकाराला कळते ते निद्रिस्त हिंदूंना कळत नाही, हे दुर्दैव ! ‘असे हिंदू मार खाण्याच्याच लायकीचे आहेत’, असेही कुणी म्हटले, तर चुकीचे ठरू नये !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवण येथील ‘राजकोट’ किल्ल्यावर उभारण्यात येणार !

सिंधुदुर्ग किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी मालवण किनारपट्टीवर पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोट हे किल्ले बांधण्यात आले. मालवणच्या किनार्‍यावर उत्तरेकडे खडकाळ आणि काहीसा उंच भाग आहे. या जागी ‘राजकोट’ किल्ला बांधण्यात आला होता.