विहिंप-बजरंग दल यांच्‍या वतीने कोल्‍हापुरात ‘शौर्य जागरण यात्रा’ !

पत्रकार परिषदेत माहिती देतांना डावीकडून तिसरे श्री. पराग फडणीस, (त्‍यांच्‍या डावीकडे) अधिवक्‍ता सुधीर वंदूरकर-जोशी आणि श्री. अशोक रामचंदानी

कोल्‍हापूर – छत्रपती शिवरायांनी स्‍थापन केलेल्‍या हिंदवी स्‍वराज्‍यास ३५० वर्षे होत आहेत. त्‍याचसमवेत विश्‍व हिंदु परिषदेच्‍या कार्यास ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्‍याचे औचित्‍य साधून विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्‍या वतीने देशभर ‘शौर्य जागरण यात्रा’ चालू आहेत. कोल्‍हापूरमध्‍ये ही शौर्य जागरण यात्रा ७ ते १० ऑक्‍टोबर या कालावधीत होत आहे. ही यात्रा वारणा-कोडोलीपासून चालू होऊन विविध ग्रामीण भागांत जाऊन कोल्‍हापूर शहर येथे १० ऑक्‍टोबरला येणार आहे, अशी माहिती विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्‍हामंत्री अधिवक्‍ता वंदूरकर-जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बजरंग दलाचे जिल्‍हा संयोजक श्री. पराग फडणीस म्‍हणाले, ‘‘या यात्रेची भव्‍य जाहीर सभा १० ऑक्‍टोबरला प्रायव्‍हेट हायस्‍कूल येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी तन, मन, धनाने सहभागी होऊन या राष्‍ट्रीय कार्यात आपले बहुमोल योगदान द्यावे.’’ या प्रसंगी विश्‍व हिंदु परिषदेचे अध्‍यक्ष श्री. कुंदन पाटील, सर्वश्री शांतीभाई लिंबानी, अनिल दिंडे, विजयराव पाटील, राजेंद्र मकोटे, अशोक रामचंदानी, ‘मातृशक्‍ती’च्‍या अश्‍विनी ढेरे, वंदना बंबळवाड उपस्‍थित होत्‍या.