अधिकार्‍याची सीबीआय कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या !

केंद्रीय अन्वेषण विभगाने (सीबीआयने) ५ लाख रुपयांची लाच घेतांना पकडलेला केंद्रीय अधिकारी जवरीमल बिश्‍नोई (वय ४४ वर्षे) याने आत्महत्या केली. बिश्‍नोई परदेश व्यवहार विभागात साहाय्यक संचालक होता.

सोनिया गांधी यांच्या जवळचे असणारे हर्ष मंदेर यांच्या संस्थेची सीबीआय चौकशी होणार

तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आणि सच्चर आयोगाचे माजी सदस्य हर्ष मंदेर यांच्या ‘अमन बिरादरी’ या संस्थेच्या विरोधात सीबीआयकडून चौकशी करण्याचा आदेश ! परकीय देणगी घेण्याच्या कायद्याचे उल्लंघन करून देणगी घेतल्याचा आरोप आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे अन्वेषण पूर्ण !

३ आठवड्यांत सीबीआय भूमिका स्पष्ट करणार

अनिल देशमुख यांच्‍या जामिनाच्‍या स्‍थगितीची याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळली !

महाराष्‍ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्‍या जामिनाला स्‍थगिती द्यावी, यासाठी केंद्रीय अन्‍वेषण यंत्रणेने केलेली याचिका २३ जानेवारी या दिवशी सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळून लावली. देशमुख यांना मुंबई उच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या जामिनाला स्‍थगिती मिळावी, यासाठी केंद्रीय अन्‍वेषण यंत्रणेने सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका केली होती.

वेणूगोपाल धूत यांची तात्‍काळ सुटका करण्‍याचे निर्देश !

आयसीआयसीआय बँक व्‍हिडिओकॉन कर्ज घोटाळा प्रकरणी व्‍हिडिओकॉन समूहाचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांना १ लाख रुपयांच्‍या जामिनावर मुंबई उच्‍च न्‍यायालयाने २० जानेवारी या दिवशी जामीन संमत केला आहे, तसेच त्‍यांना तात्‍काळ कारागृहातून सोडण्‍याचे निर्देश दिले आहेत.

शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांच्यावरील ‘इस्रो’च्या हेरगिरीचे आरोप खोटे !

सीबीआयची केरळ उच्च न्यायालयात माहिती
नारायणन् यांना अडकवणे, हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असल्याचा सीबीआयचा दावा

सीबीआयद्वारे हिंदु नेत्याच्या हत्येचे अन्वेषण करण्याची मागणी पूर्ण न झाल्याने कुटुंबियांचे उपोषण

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा या हिंदुद्रोही पक्षाचे सरकार असल्याने हिंदूंना न्याय मिळण्याची शक्यता अल्पच आहे !

गोव्यात मागील ५ वर्षांत भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता यांसंबंधी एकही तक्रार नसणे चिंताजनक ! – आशिष कुमार, अधीक्षक, ‘सी.बी.आय.’ (भ्रष्टाचारविरोधी पथक)

भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रार न करणे आणि लाच देऊन त्यात सहभागी होणे, हा राष्ट्र्रद्रोहच !

नाशिक येथे सैन्यातील मेजर आणि अभियंता यांना लाच घेतांना पकडले !

नाशिक येथील ‘कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’च्या परिसरात मेजर आणि साहाय्यक गिअर्सन इंजिनियर हिमांशू मिश्रा अन् कनिष्ठ अभियंता मिलिंद वाडिले यांना एका कंत्राटदाराकडून लाच घतांना सीबीआयच्या (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या) पथकाने पकडले.

काँग्रेसच्या काळात ६० टक्के आणि भाजपच्या काळात ९५ टक्के विरोधी पक्षांच्या नेत्यांचे अन्वेषण !

विशेष म्हणजे दोन्ही सरकारच्या काळात संबंधित नेत्याने पक्ष पालटण्यावर त्याच्यावरील कारवाई थंड झाल्याचे दिसून आले.