डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे अन्वेषण पूर्ण !

  • सीबीआयची मुंबई उच्च न्यायालयात माहिती

  • ३ आठवड्यांत सीबीआय भूमिका स्पष्ट करणार

डॉ. नरेंद्र दाभोलकर

मुंबई – डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे अन्वेषण, तसेच नव्याने चालू केलेले अन्वेषणही पूर्ण झाले आहे. या प्रकरणी आणखी अन्वेषण करण्याची आवश्यकता नाही. या संदर्भातील अहवाल अन्वेषण करणार्‍या अधिकार्‍यांनी देहलीतील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) मुख्यालयात पाठवला आहे. येत्या ३ आठवड्यांत सीबीआय स्वतःची भूमिका स्पष्ट करेल, अशी माहिती सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर अनिल सिंह यांनी ३० जानेवारी या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी मुंबई उच्च न्यायालयात माहिती दिली.