सोनिया गांधी यांच्या जवळचे असणारे हर्ष मंदेर यांच्या संस्थेची सीबीआय चौकशी होणार

परकीय देणगी कायद्याचे उल्लंघन केल्याचे प्रकरण

तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आणि सच्चर आयोगाचे माजी सदस्य हर्ष मंदेर (छायाचित्र सौजन्य: नवभारत टाईम्स)

नवी देहली – तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आणि सच्चर आयोगाचे माजी सदस्य हर्ष मंदेर यांच्या ‘अमन बिरादरी’ या संस्थेच्या विरोधात सीबीआयकडून चौकशी करण्याचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला आहे.

मंदेर यांनी परकीय देणगी घेण्याच्या कायद्याचे उल्लंघन करून देणगी घेतल्याचा आरोप आहे. हर्ष मंदेर हे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या जवळचे मानले जातात.