नाशिक येथे सैन्यातील मेजर आणि अभियंता यांना लाच घेतांना पकडले !

नाशिक – येथील ‘कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’च्या परिसरात मेजर आणि साहाय्यक गिअर्सन इंजिनियर हिमांशू मिश्रा अन् कनिष्ठ अभियंता मिलिंद वाडिले यांना एका कंत्राटदाराकडून लाच घतांना सीबीआयच्या (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या) पथकाने पकडले. १ लाख २० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी त्यांनी संबंधित कंत्राटदाराकडे केली होती. कंत्राटदाराने या संदर्भात तक्रार केली होती. नुकतेच नाशिक मनपा प्रशासनातील २ कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

सैन्यदलात जर भ्रष्टाचार बोकाळला असेल, तर ते अत्यंत धोकादायक आहे !