लाचखोरीच्या प्रकरणात करण्यात आली होती अटक
बिश्नोई समाजातील लोकांकडून सीबीआय पथकावर आक्रमण
राजकोट (गुजरात) – केंद्रीय अन्वेषण विभगाने (सीबीआयने) ५ लाख रुपयांची लाच घेतांना पकडलेला केंद्रीय अधिकारी जवरीमल बिश्नोई (वय ४४ वर्षे) याने आत्महत्या केली. बिश्नोई परदेश व्यवहार विभागात साहाय्यक संचालक होता. त्याची सीबीआय कार्यालयात चौकशी चालू असतांना त्याने चौथ्या मजल्यावरील खिडकीतून खाली उडी मारली. यात त्याचा मृत्यू झाला. जवरीमल बिश्नोई याच्या मृत्यूची बातमी कळताच बिश्नोई समाजाच्या लोकांनी रुग्णालयाबाहेर सीबीआयच्या पथकावर आक्रमण केले. ही घटना २६ मार्च या दिवशी घडली.
DGFT official caught taking Rs 5 lakh bribe jumps to death https://t.co/UyabEpSOlM
— TOI Cities (@TOICitiesNews) March 26, 2023
सीबीआय अधिकार्यांचे पथक बिश्नोईच्या राजकोट निवासस्थानी गेल्यावर त्याच्या नातेवाइकांनी काही नोटांचे गाठोडे बांधून ते सदनिकेतून बाहेर फेकले होते. सीबीआयने हे गाठोडे जप्त केले.