झारखंडमधील हिंदु नेत्याच्या हत्येचे प्रकरण
पश्चिमी सिंहभूम (झारखंड) – येथे हिंदु नेते कमलदेव गिरि यांची १२ नोव्हेंबर यादिवशी पेट्रोल बाँब फेकून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर येथे हिंसाचार झाला होता. या आक्रमणाच्या निषेधार्थ गिरि यांच्या समर्थकांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता. त्या वेळी पोलीस आणि प्रशासन यांनी गिरि यांच्या कुटुंबियांना हानीभरपाई देण्याचे, त्यांच्या घरातील एकाला सरकारी नोकरी देण्याचे, तसेच या हत्येचे सीबीआयद्वरे अन्वेषण करण्याचे आश्वासन देऊन पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचे मन वळवले; मात्र आता एक मासानंतरही पोलीस आणि प्रशासन यांनी आश्वासन पूर्ण न केल्याने गिरि यांचे कुटुंबीय उपोषणाला बसले आहेत.
चक्रधरपुर में सीबीआई जांच के लिए कमलदेव के परिजनों के अनिश्चितकालीन अनशन का आज तीसरा दिन। परिजनों ने सीबीआई जांच नहीं होने पर आत्मदाह की चेतावनी दी है। pic.twitter.com/IyhOofZYPt
— News18 Jharkhand (@News18Jharkhand) December 5, 2022
कमलदेव गिरि यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. यात ७ मुसलमान, तर २ हिंदू आहेत. गिरि यांचे भाऊ फुलनाथ यांनी ‘या हत्येमागे सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे स्थानिक आमदार सुखराम उराँव यांचा हात असून पोलीस त्यांना अटक करण्याचे धाडस दाखवत नाही’, असे सांगितले.
संपादकीय भूमिकाझारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा या हिंदुद्रोही पक्षाचे सरकार असल्याने हिंदूंना न्याय मिळण्याची शक्यता अल्पच आहे ! |