मुंबई – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनाला स्थगिती द्यावी, यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने केलेली याचिका २३ जानेवारी या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाला स्थगिती मिळावी, यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर बारमालकांकडून १०० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य दिले असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ‘ईडी’ने १ नोव्हेंबर २०२१ या दिवशी देशमुख यांना अटक केली होती. या अपहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदवला. डिसेंबर २०२२ मध्ये त्यांची जामिनावर सुटका झाली.