कोयिलांडी (केरळ) एटीएम् दरोडा प्रकरण
कोयिलांडी (केरळ) – येथील एटीएम् दरोडा प्रकरणी कोयिलांडी पोलिसांनी ३ मुसलमान तरुणांना नुकतीच अटक केली. अटक केलेल्यांमध्ये सुहैल सुलेमन (वय २४ वर्षे), महंमद ताहा (वय २७ वर्षे) आणि महंमद यासर (२० वर्षे) यांचा समावेश आहे. १९ ऑक्टोबर २०२४ या दिवशी या आरोपींनी कट रचून दरोडा टाकला आणि एटीएममध्ये भरण्यासाठी नेत असलेले ६२ लाख रुपये पळवले होते. चोरीला गेलेल्या या पैशांपैकी विल्लीयापल्ली मशिदीतून ३७ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
‘इंडिया वन एटीएम’चा कर्मचारी सुहैल सुलेमन याने तक्रार नोंदवली होती की, कोयिलांडीजवळ कुरुडीमुक्कू येथे एटीएमसाठीचे रोख रक्कम नेत असतांना मुखवटा घातलेल्या २ तरुणांनी त्याच्यावर आक्रमण केले; परंतु सुहैलच्या मूळ जबाबानुसार रोख हस्तांतरणाच्या वेळी दरोडेखोरांनी त्याच्यावर आक्रमण केले आणि त्यांनी वाहनातून २५ लाख रुपये पळवले. यावरून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर सुहैलने त्याचे २ साथीदार महंमद ताहा आणि महंमद यासर यांच्या साहाय्याने चोरी घडवल्याची स्वीकृती दिली.
अन्वेषणात आरोपींपैकी महंमद ताहा मशिदीत काम करत असल्याचे उघड झाले. ताहा काम करत असलेल्या विल्लियापल्ली येथील मशिदीतून पोलिसांनी सुमारे ३७ लाख रुपये जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाचोरीचा पैसे मंदिरातून जप्त करण्यात आला असता, तर देशपातळीवर बातमी झाली असती; मात्र येथे मशिदीतून पैसा जप्त केल्यावर प्रसारमाध्यमे बातमी दडपतात, हे लक्षात घ्या ! |