भारताने स्वत:ची सैन्यक्षमता आणि युद्धसामुग्रीचे आधुनिकीकरण यांवर भर द्यायला हवा ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

भारतालाही पुढील काळात कुणावरही अवलंबून न रहाता स्वत:च्या सामर्थ्याने लढावे लागेल.

श्रीलंकेत भारतीय सैन्य तैनात होणार नाही ! – भारतीय उच्चायुक्त 

श्रीलंकेतील आर्थिक संकटावरून निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे येथे भारतीय सैन्य तैनात करण्याविषयी चर्चा चालू आहे. श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त यांनी ‘याविषयीच्या अफवा निराधार आहेत’, असे म्हटले आहे.

सैन्यभरतीची सक्ती !

राष्ट्रप्रेम जागृत ठेवून राष्ट्रसेवा करणाऱ्यांना एवढेच सांगावेसे वाटते की, हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा ।, असे म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, अशी गर्जना करणारे लोकमान्य टिळक यांसारख्या अनेकांचा वारसा राष्ट्राला लाभला आहे. त्यांचा आदर्श जोपासूया आणि सरकारच्या योजनेद्वारे राष्ट्रकर्तव्य पार पाडूया !

आता युक्रेनकडूनही रशियाच्या सैनिकांवर अत्याचार !

युक्रेनच्या बुचा शहरामध्ये रशियाच्या सैनिकांनी युक्रेनच्या नागरिकांचा नरसंहार केल्याच्या घटनेनंतर आता युक्रेनच्या सैनिकांनीही रशियाला प्रत्युत्तर  दिले आहे. कीव येथील एका गावामध्ये पकडण्यात आलेल्या रशियाच्या सैनिकांना अमानुषपणे ठार मारण्यात आले. याचा व्हिडिओही प्रसारित झाला आहे.

रशियावर तात्काळ कार्यवाही करा किंवा संघटनेला विसर्जित करा !

संयुक्त राष्ट्रांनी जगातील एकतरी समस्या सोडवली आहे का ? भारताने काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांत नेऊन ७४ वर्षे झाली आहेत; मात्र त्यावर कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे ‘झेलेंस्की यांना जे वाटते, तेच आता करण्याची आवश्यकता आहे’, अशी आता जगभरातून मागणी झाली पाहिजे.

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची अपयशी कारकीर्द !

महागाई ! अन्नधान्य, दूध, खाण्याचे सर्व पदार्थ, तसेच बांधकाम उद्योग यांच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तानमधून लाखो शरणार्थी पाकिस्तानमध्ये शरण आले आहेत. लोकांना महागाई अल्प आणि हाताला काम पाहिजे असते. तसे काहीही झाले नाही. त्यामुळे पाकिस्तानी जनता सरकारच्या विरोधात गेली आहे.

श्रीलंकेत आणीबाणी लागू !

श्रीलंकेमधील आर्थिक संकटामुळे नागरिकांकडून होत असलेल्या हिंसक आंदोलनांमुळे देशात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. २ दिवसांपूर्वीच नागरिकांनी राष्ट्रपती गोटबाय राजपक्षे यांच्या निवासस्थानाबाहेर हिंसक आंदोलन केले होते.

कीव येथील सैनिकी कारवाई न्यून करण्याच्या रशियाच्या आश्वासनावर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांकडून संशय व्यक्त !

झेलेंस्की म्हणाले, ‘‘आम्हाला चर्चेतून जे संकेत मिळाले ते सकारात्मक आहेत; पण आम्ही सर्व धोके तपासून पहात आहोत. आमच्या विनाशासाठी लढा देत असलेल्या देशाच्या काही प्रतिनिधींच्या शब्दांवर विश्वास ठेवण्याचे आम्हाला कोणतेही कारण दिसत नाही.’’

पाकच्या बुजगावण्या नेतृत्वाचा अस्त !

जो कुणी पदावर येईल, त्याचे काही दिवसांनी तेच हाल होतील, जे सध्या इम्रान खान यांचे होत आहेत. यासह तो आतंकवादाला खतपाणी घालील आणि भारतद्वेषही जोपासेल. त्यामुळे या दुष्टचक्रातून पाकचीच नव्हे, तर जगाची सुटका करायची असेल, तर जगानेच आता पाकच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव आणून त्याला नामशेष केले पाहिजे !

राष्ट्ररक्षणाचे कर्तव्य निभावणार्‍या समर्पित सैनिकांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवा !

देशद्रोही आतंकवाद्यांना वाचवण्यासाठी सैनिकांवर होत असलेली दगडफेक पहात रहाणे आणि आमचे वीर सैनिक राजकीय नेत्यांच्या चक्रव्युहात फसून मुकाटपणे मार खात रहाणे यांमुळे सैनिकांचे मनोबळ ढासळणार नाही का ?