चीनने प्रथम सीमेवरून सैन्य हटवावे, तरच द्विपक्षीय संबंध सामान्य होतील !

वर्ष २०२० च्या गलवान खोर्‍यात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांतील सर्वोच्च स्तरावरील ही पहिलीच चर्चा आहे. प्रत्येक वेळी भारताने पूर्व लडाखमध्ये चीनने सैन्य पूर्णपणे मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

रशियन सैन्याला ९ मे पर्यंत युद्ध संपवण्याचा आदेश असल्याचा युक्रेनचा दावा

शिया ९ मेपर्यंत युद्ध संपवू इच्छित आहे; कारण त्याच्या सैन्याला तसा आदेश देण्यात आला आहे, असा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे. ९ मे हा दिवस दुसर्‍या महायुद्धात रशियाने जर्मनीच्या नाझी सैन्यावर विजय मिळवल्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

रशियाला शह देण्यासाठी ‘नाटो’ ४ तुकड्या पाठवणार

शिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धास प्रारंभ होऊन एक मास उलटला असून यासंदर्भात एक तातडीची बैठक घेण्यासाठी ‘नाटो’चे (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’चे) सर्व सदस्य देश बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे शिखर संमेलनाच्या निमित्ताने एकत्रित आले आहेत.

युक्रेनी सैन्याकडून रशियन सैनिकांना हुसकावून लावण्यास आरंभ ! – अमेरिकेचा दावा

युक्रेनची राजधानी कीवच्या पश्चिमेला असलेल्या मकारिव शहरामध्ये पुन्हा एकदा युक्रेनचा ध्वज फडकावण्यात आला आहे.

पुतिन युक्रेनवर रासायनिक आणि जैविक शस्त्रे यांद्वारे आक्रमण करू शकतात ! – बायडेन

अमेरिका रशियावर अत्यधिक तीव्रतेचे निर्बंध लादत असल्याने रशिया अमेरिकेवर ‘सायबर आक्रमणे’ही करू शकतो, असेही बायडेन म्हणाले.

सैन्य भरतीमध्ये युवकांना वयोमर्यादेत सवलत द्या ! – खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

सैन्यात जाण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी ते अपार कष्ट घेतात; मात्र कोरोनामुळे सैन्य भरतीप्रक्रिया सतत स्थगित होत आहे. परिणामी युवकांची संधी हुकत असून त्यांचा स्वप्नभंग होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला तिन्ही सैन्यदलांच्या शस्त्रसज्जतेचा आढावा !

या वेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सितारामन्, परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

रशिया लवकरच ‘नाटो’च्या सदस्य देशांवरही आक्रमण करील ! – युक्रेनची चेतावणी

या वेळी झेलेंस्की यांनी पुन्हा एकदा ‘नॉटो’ने रशियासाठी ‘नो फ्लाय झोन’ (प्रतिबंधित हवाई क्षेत्र) घोषित करण्याचा पुनरूच्चार केला. युक्रेनची ही मागणी यापूर्वी ‘नाटो’ने फेटाळली होती.

काश्मीरमध्ये ३ चकमकींमध्ये ४ आतंकवादी ठार; एका आतंकवाद्याला अटक

कितीही आतंकवादी ठार केले, तरी जोपर्यंत पाकला संपवण्यात येणार नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही !

चीन आणि भारत यांच्यातील सैन्य स्तरावरील बैठक देपसांग आणि डेमचोक येथून चीनने त्याचे सैन्य माघारी न्यावे ! – भारताची मागणी

अशा मागण्यांना चीन भीक घालणार नाही. त्यासाठी आक्रमक धोरण राबवून चिनी सैनिकांना तेथून हाकलून लावणे आवश्यक आहे !