कीव (युक्रेन) – युक्रेनच्या बुचा शहरामध्ये रशियाच्या सैनिकांनी युक्रेनच्या नागरिकांचा नरसंहार केल्याच्या घटनेनंतर आता युक्रेनच्या सैनिकांनीही रशियाला प्रत्युत्तर दिले आहे. कीव येथील एका गावामध्ये पकडण्यात आलेल्या रशियाच्या सैनिकांना अमानुषपणे ठार मारण्यात आले. याचा व्हिडिओही प्रसारित झाला आहे.
युक्रेन-रशिया युद्ध वर्षभर चालू शकते !
‘नाटो’ (नॉर्थ अॅटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) देशांचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनी म्हटले आहे की, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध काही मास किंवा वर्षभर तरी चालू शकते. यामुळेच ‘नाटो’ देशांनी युक्रेनला साहाय्य करणे चालूच ठेवले पाहिजे.
युक्रेन युद्ध जिंकू शकतो ! – अमेरिका
अमेरिकेचा संरक्षण विभाग असलेल्या ‘पेंटगॉन’चे माध्यम सचिव जॉन किर्बी यांनी दावा केला आहे की, युक्रेन रशियाच्या विरोधातील युद्ध जिंकू शकतो. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची रणनीती अयशस्वी ठरली आहे.