कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेतील आर्थिक संकटावरून निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे येथे भारतीय सैन्य तैनात करण्याविषयी चर्चा चालू आहे. श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त गोपाल बागले यांनी ‘याविषयीच्या अफवा निराधार आहेत’, असे म्हटले आहे. ते म्हणाले की, १ एप्रिलपासून श्रीलंकेत भारतीय सैन्य तैनात करण्याविषयी अफवा पसरवली जात आहे. संकटकाळात भारत श्रीलंकेला साहाय्य करण्यास सिद्ध आहे. कोरोनाच्या काळात भारताने श्रीलंकेला साहाय्य केले होते. सध्याच्या संकटाच्या काळातही भारताने श्रीलंकेला साहाय्याचा हात पुढे केला आहे.
On the deployment of Indian Army in Sri Lanka, Gopal Baglay, India’s High Commissioner to Sri Lanka called it a rumour floating around since April 1, adding that the Commission rejected the claim right away, it should not be spread, and that it is baseless. pic.twitter.com/10i2mg1rmb
— ANI (@ANI) April 8, 2022