सामाजिक सलोखा ?

रामनवमीला देहली, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, बंगाल या राज्यांमध्ये मिरवणुकीच्या वेळी दगडफेक करण्यात आली. हिंदु युवक नागराजू याची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. अशा वेळी सलोख्यासाठी सामाजिक स्तरावर राबवलेल्या या उपक्रमांचा ‘सामाजिक सलोखा’ राखण्याच्या दृष्टीने लाभ होतो का ? हा प्रश्न उघड गुपित आहे !

अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी अवैध भोंग्यांच्या समस्येवर राजकीय नेत्यांनी तोडगा न काढणे ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मुसलमानांमध्ये वहाबी, सुन्नी, शिया, सलाफी आदी अनेक जाती असून ते एकमेकांच्या मशिदीत जात नाहीत. त्यामुळे एक अजान संपली की, दुसऱ्याची चालू होते.

बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारकडून पर्यटन विभागातील खासगी मुसलमान कर्मचार्‍यांना ईद निमित्त ४ सहस्र ८०० रुपये भेट !

दिवाळी किंवा हिंदूंच्या अन्य सणांच्या वेळी हिंदु कर्मचार्‍यांना कधी अशी भेट तृणमूल काँग्रेस देते का ?

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मुसलमानांसाठी इफ्तार पार्टी !

मुसलमानांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करणाऱ्या पोलिसांनी कधीतरी हिंदूंसाठीही दिवाळी पहाट, गुढीपाडवा शोभायात्रा, दसऱ्याच्या शुभेच्छा देणे किंवा कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने मसाला दूध वाटप, असे कार्यक्रम आयोजित केलेत का ?

मुसलमान इस्लामद्वेषाचे बळी ठरत असल्याचे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे फुकाचे बोल !

जगभर ईद साजरी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी, ‘जगभरात मुसलमान इस्लामद्वेषाचे बळी ठरत आहेत. अमेरिका अधिकाधिक सशक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत; मात्र त्यांना अनेक धोके आहेत’, असे वक्तव्य केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुसलमान समाजासाठी ‘इफ्तार पार्टी’चे आयोजन !

एकीकडे मनसेचे प्रमुख राज ठाकरे भोंग्यावरून कणखर भूमिका घेत असतांना सांगली शाखेकडून ‘इफ्तार पार्टी’चे आयोजन आश्चर्यकारक आहे !

रमजान ईदनिमित्त मीरारोड पोलिसांकडून इफ्तार पार्टी !

या पार्टीला स्थानिक मशीद आणि मदरसे यांतील मौलाना, स्थानिक मुसलमान यांसह मीरारोड, वसई, विरार येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

तेलंगणामध्ये रमझान मासाच्या निमित्ताने वाहतूक महामंडळाकडून प्रवाशांसाठी २५ टक्के सवलत

हिंदूंच्या सणांच्या काळात तेलंगाणा राष्ट्र समिती सरकारचे राज्य रस्ते वाहतूक महामंडळाकडून अशी सवलत दिली जाते का ?

राज्यातील १४२ मदरशांसाठी ५ कोटी ३७ लाख रुपयांचे अनुदान !

काही मदरशांमध्ये शस्त्रे आढळणे, अल्पवयीन मुला-मुलींवर अत्याचार होणे यांसारखे प्रकार झाल्याच्या घटना अधूनमधून पुढे येत असतात. ‘अशा मदरशांना निधी मिळत असेल, तर राष्ट्रविघातक शक्तींना चालना देण्यासारखेच आहे’, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ? 

बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथील एचडीएफसी बँकेत नमाजपठण आणि इफ्तार

बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथील पैसार भागातील एचडीएफसी बँकेमध्ये नमाजपठण आणि इफ्तार आयोजित करण्यात आल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर याचा विरोध केला जात आहे.