अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारीही सहभागी
पुणे – येथील आझम कॅम्पस ग्राऊंड, कॅम्प येथे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, तसेच अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी पुणे शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि मुसलमान यांना या इफ्तार पार्टीला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण दिले होते. विशेष म्हणजे निमंत्रण पत्रिकाही हिरव्या रंगात छापली होती. (मुसलमानांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करणाऱ्या पोलिसांनी कधीतरी हिंदूंसाठीही दिवाळी पहाट, गुढीपाडवा शोभायात्रा, दसऱ्याच्या शुभेच्छा देणे किंवा कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने मसाला दूध वाटप, असे कार्यक्रम आयोजित केलेत का ? – संपादक)
संपादकीय भूमिकापोलीस रमजानच्या काळात अनेक ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करतात; मात्र श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती या दिवशी झालेल्या मिरवणुकांवर धर्मांधांनी केलेली आक्रमणे, हिंसाचार रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरील आक्रमणे, तसेच देहली येथील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी मुसलमानबहुल भागात गेलेल्या पोलिसांवरील धर्मांधांनी केलेली दगडफेक पहाता, ‘पोलिसांनी आयोजित केलेल्या अशा इफ्तार पार्ट्यांची फलनिष्पत्ती काय ?’, असा प्रश्न उपस्थित होत आहे ! |