मुंबई – रमझान ईदनिमित्त मीरारोड पोलीस ठाण्याच्या वतीने २५ एप्रिल या दिवशी इफ्तार पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला स्थानिक मशीद आणि मदरसे यांतील मौलाना, स्थानिक मुसलमान यांसह मीरारोड, वसई, विरार येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी मीरारोड विभागाचे पोलीस उपआयुक्त अमित काळे, साहाय्यक पोलीस आयुक्त विलास सानप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल यांसह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते.
या वेळी भाजपचे पदाधिकारी नीलेश सोनी यांनी मुसलमान आणि हिंदू यांमध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा, यासाठी ही पार्टी आयोजित केल्याचे म्हटले. मनसे आणि काँग्रेस पक्षांचे पदाधिकारी या पार्टीला उपस्थित होते.