तेलंगणामध्ये रमझान मासाच्या निमित्ताने वाहतूक महामंडळाकडून प्रवाशांसाठी २५ टक्के सवलत

तेलंगणा राज्य रस्ते वाहतूक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व्ही.सी. सज्जनार

भाग्यनगर (तेलंगणा) – तेलंगणा राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने (टी.एस्.आर्.टी.सी.ने) रमझान मासाच्या निमित्ताने प्रवाशांसाठी मोठी सवलत घोषित केली आहे. माल आणि पार्सल यांच्या शुल्कावर २५ टक्के सवलत देण्यात येणार आहे, असे या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व्ही.सी. सज्जनार यांनी सांगितले.

सज्जनार यांनी तेलंगाणा राज्य वाहतूक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारल्यापासून ते नाविन्यपूर्ण सवलती आणि योजना यांद्वारे प्रवाशांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळे यांसाठी विशेष बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. महामंडळाने महसूल मिळवण्यासाठी नवीन योजना सिद्ध केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सण आणि विशेष दिवस यांसाठी खास सवलत देण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या सणांच्या काळात तेलंगाणा राष्ट्र समिती सरकारचे राज्य रस्ते वाहतूक महामंडळाकडून अशी सवलत दिली जाते का ?