Extradite Sheikh Hasina : शेख हसीना यांना बांगलादेशाकडे सोपवा ! – ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’

[WPI_DISPLAY_SHARE_ICONS]

‘बांगलादेश नॅशनल पार्टी’कडून भारताला आवाहन !

डावीकडून मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर आणि शेख हसीना

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’चे (‘बी.एन्.पी.’चे) सरचिटणीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी शेख हसीना यांचे बांगलादेशकडे प्रत्यार्पण करण्यास सांगितले आहे. ते म्हणाले की, शेख हसीना यांना कायदेशीर मार्गाने बांगलादेश सरकारकडे सोपवण्याचे आमचे भारताला आवाहन आहे.

१. मिर्झा फखरुल यांनी पत्रकारांना सांगितले की, शेख हसीना यांना आश्रय देऊन भारत लोकशाहीप्रती असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेनुसार वागत असल्याचे दिसत नाही. शेख हसीना भारतात राहून बांगलादेशातील आंदोलन हाणून पाडण्यासाठी अनेक कट रचत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

२. फखरुल पुढे म्हणाले की, बांगलादेशातील जनता शेख हसीना यांचा गुन्हा लहान मानत नाही. हसीना यांच्या कार्यकाळात बांगलादेशावर १८ लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले असून अनुमाने १ सहस्र कोटी डॉलर्स देशातून हिसकावण्यात आले. त्यांच्या राजवटीत देशातील सर्व संस्था उद्ध्वस्त करण्यात आल्या.

३. बांगलादेशाच्या ‘आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी प्राधिकरणा’त शेख हसीना आणि इतर २३ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी प्राधिकरणाकडे नोंद झालेला हा चौथा गुन्हा आहे. सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता एम्.एच्. तमीम यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानंतर आरोपींविरुद्ध अटक करण्याची नोटीस काढली जाईल.

संपादकीय भूमिका 

आता अशा प्रकारे आवाहन करणारा बांगलादेश नंतर भारताच्या विरोधात कारवाया चालू करील, यात शंका नाही !

[WPI_DISPLAY_SHARE_ICONS][RELATED_ARTICLES]