निसर्गोपचारतज्ञ दीपक जोशी यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधकांना बिंदूदाबनाविषयी शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

शिबिराला येण्याच्या आदल्या दिवशी मला डोकेदुखी, अंगदुखी आणि अस्वस्थता वाटत होती. मी शिबिराला आल्यावर निसर्गोपचारतज्ञ दीपक जोशी यांनी माझ्यावर बिंदूदाबानाचे उपचार केल्यानंतर माझे सर्व त्रास दूर झाले.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या काळात रामनाथी आश्रमात आलेल्या साधिकेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या व्यापकत्वाविषयी आलेल्या अनुभूती

नामजपादी उपाय करतांना माझ्याकडून प्रार्थना होत होती. तेव्हा मला सूक्ष्मातून एक दृश्य दिसले, ‘संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा (गुरुदेवांचा) देह आहे. त्या देहात आम्ही सर्व जण रक्ताच्या थेंबाप्रमाणे सामावलेलो आहोत.’ 

पुणे येथील कु. सान्वी जरीपटके (वय १३ वर्षे) हिला रामनाथी आश्रमात आलेल्या अनुभूती

रात्री मी झोपायला गेल्यावर मला झोप लागली नाही. तेव्हा मी श्रीकृष्णाला प्रार्थना केली. काही वेळाने मला ‘माझ्या बाजूला कुणीतरी आले आहे’, असे वाटले. नंतर माझ्या मनात विचार आला, ‘माझ्यासमवेत श्रीकृष्ण आहे.’

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना नवरात्रीच्या दिवसांत पदार्थ बनवून देण्याची इच्छा होणे आणि प्रत्यक्षात त्याच सेवेसाठी साधिकेला बोलावणे 

‘वर्ष २०२४ च्या नवरात्रीपूर्वी माझ्या मनात ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना नवरात्रीत काहीतरी खायचे पदार्थ बनवून देऊया’, असे विचार येत होते. त्यानुसार मी मानसरित्या त्यांना पुरणपोळी, गुलाबजाम, खीर, शिरा इत्यादी पदार्थ बनवून अर्पण करू लागले…

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपादी उपाय करतांना साधकाच्या मनात आलेले विचार

‘माझ्या मनात विचार आला, ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा ।’, असे- प.पू. भक्तराज महाराज यांनी म्हटले आहे. ‘मन प्रकृतीशी चिकटलेले असते. डोळे हे त्याचे माध्यम आहेत. मनाला अंतःचक्षू आणि भावचक्षू यांनी चैतन्याशी म्हणजे ईश्वराशी जोडले की, ते बाह्य प्रकृतीपासून निर्लिप्त होऊन परब्रह्म स्वरूपात विलीन होऊ लागते…

यवतमाळ येथील कु. कृष्णा पारधी (वय १४ वर्षे) याला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आलेल्या अनुभूती

‘मी घरी असतांना आईला सेवेत साहाय्य करतो. त्या वेळी २० ते २५ मिनिटे सेवा केल्यावर मला कंटाळा येत असे; मात्र मी शाळेच्या सुटीत आश्रमात आल्यावर माझ्या क्षमतेनुसार कितीही सेवा केली, तरी मला थकवा जाणवला नाही.

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना साधकाला ध्यानमंदिरातील देवतांविषयी सूक्ष्मातून मिळालेली माहिती

हनुमंत आणि श्री दुर्गादेवी यांनी त्यांचा डावा पाय भूमीवर ठेवला आहे. त्यातून ते मारक शक्ती पाताळात सोडत आहेत. ते अनिष्ट शक्तींना निस्तेज करून त्यांच्यातील मारकता नष्ट करत आहेत. 

ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना साधकाला आलेली अनुभूती

पादुकांच्या वरच्या बाजूस असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राच्या सभोवती चंदेरी प्रकाशाचे चक्र फिरत आहे आणि त्या प्रकाशाने संपूर्ण ध्यानमंदिर उजळून निघाले आहे. 

‘वैखरी’, ‘मध्यमा’, ‘पश्यंती’ आणि ‘परा’ या चार वाणींमधील गायनाचा साधिकेला जाणवलेला परिणाम

‘आवाजाची पट्टी न्यून केली असता आवाजात अधिक सूक्ष्मता येते’, असे मला जाणवले. ‘गाणे गुणगुणणे किंवा हळू आवाजात गाणे’, हे वैखरी वाणीशी निगडित असून ते अधिक सूक्ष्म होत जाते.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी साधिकेला स्वप्नात केलेल्या मार्गदर्शनानुसार तिने नामजप केल्यानंतर तिला होणारे आध्यात्मिक त्रास दूर होणे

‘रामनगर, बेळगाव येथील कु. श्रद्धा नागेंद्र गावडे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यानंतर तिला आध्यात्मिक त्रास झाले. तिला स्वप्नात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे दर्शन झाले. त्यांनी सांगितलेला नामजप केल्यावर तिला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.