कृतज्ञतेने वंदन करतो सनातनच्या गुरुपरंपरेला ।

‘सनातन धर्माची गुरुपरंपरा आद्यशंकराचार्य यांच्यापासून आतापर्यंत चालू आहे. आद्यशंकराचार्य यांच्यानंतर पृथ्वीवर झालेला भगवंताचा अवतार म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, असे सप्तर्षींनी सांगितले आहे. असे महान गुरु सनातन संस्थेच्या साधकांना लाभले आहेत. मागील ३१ वर्षांपासून ते माझ्याकडून साधना करवून घेत आहेत. ‘त्यांच्यानंतर सनातनच्या साधकांना पृथ्वीतलावर कुणाचा आधार असणार ?’ असे माझ्यासारख्या सर्वसाधारण साधकाला वाटते. त्याचीही चिंता सोडवण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी म्हणून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची सप्तर्षींच्या माध्यमातून निवड केली आहे. त्यासाठी त्यांच्या चरणी कवितापुष्प अर्पण करून वंदन करतो.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

वंदन माझे सनातनच्या दैवी गुरुपरंपरेला ।
सनातन धर्म जगती पसरवणार्‍या श्रीगुरूंना ।
सनातन धर्माची ज्योत तेवत ठेवणार्‍यांना ।। १ ।।

वंदन माझे आद्य शंकराचार्यांना ।
धर्मबुडव्यांना हरवून धर्मजागृती करणार्‍यांना ।
सनातन धर्माला ऊर्जितावस्था आणणार्‍यांना ।। २ ।।

पू. शिवाजी वटकर

वंदन माझे परम पूज्य भक्तराज महाराजांना ।
भजन करून भक्तीमार्ग दाखवणार्‍यांना ।
शिष्योत्तम परम पूज्यांना (टीप १) घडवणार्‍यांना ।। ३ ।।

वंदन माझे सच्चिदानंद परब्रह्म परम पूज्यांना ।
सहस्रो साधक अन् अनेक संत सिद्ध करणार्‍यांना ।
हिंदु राष्ट्र निर्मितीचे अवतारी कार्य करणार्‍यांना ।। ४ ।।

वंदन माझे श्रीसत्‌शक्ति बिंदामातेला (टीप २) ।
साधकांच्या साधनेचे शिवधनुष्य लीलया पेलणार्‍यांना ।
सनातनची दैवी गुरुपरंपरा चालवणार्‍यांना ।। ५ ।।

वंदन माझे श्रीचित्‌शक्ति अंजलीमातेला (टीप ३) ।
सनातनच्या साधकांचे रक्षण करणार्‍यांना ।
सनातन धर्माची गुरुपरंपरा चालवणार्‍यांना ।। ६ ।।

वंदन करिती साधक सनातनच्या वंदनीय श्रीगुरूंना ।
साधकांची साधना करवून मोक्षाला नेणार्‍यांना ।
कृतज्ञतेने वंदन करतो सनातनच्या गुरुपरंपरेला ।। ७ ।।

टीप १ – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना

टीप २ आणि ३ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी आणि सनातनची दैवी गुरुपरंपरा चालवणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक