रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून साधकाला आलेल्या अनुभूती

मी स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहात असतांना मला सूक्ष्मातून दिसले, ‘श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शनचक्र गतीमान झाले आहे. त्या सुदर्शनचक्रातून निळसर रंगाचा प्रकाशाचा झोत वेगाने सर्वदूर जात आहे.’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधकत्ववृद्धी शिबिरा’तील साधकांना आलेल्या अनुभूती !

‘आश्रमातील सभागृहात श्रीरामाचे चित्र आहे. त्या चित्रातील श्रीराम सजीव असून ‘तो कोणत्याही क्षणी उठून उभा राहील’, असे मला वाटले. जेव्हा मी चित्रावरून दृष्टी बाजूला केली, तेव्हा मला सूक्ष्मातून रामरूपातील गुरुदेवांचे दर्शन झाले. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली.’

धर्माचरणाची आवड आणि गुरूंप्रती भाव असलेली कुशलनगर (कर्नाटक) येथील ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. खुशी मृत्युंजय कुरवत्ती (वय १३ वर्षे) !

एकदा मडिकेरी येथे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा होती. खुशीच्या नकळत तिच्या शिक्षकांनी तिचे नाव घेतले. तेव्हा मला वाटले, ‘ती एकटीच मेडिकेरी येथे कशी जाणार ?’ तेव्हा खुशीने मला सांगितले, ‘‘गुरु आहेत. ते काळजी घेतील.’’ नंतर तिला तिच्याच शाळेच्या बसमधून मडिकेरी येथे नेण्यात आले. तिला त्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

गुरूंप्रती भाव असलेला ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उडुपी, कर्नाटक येथील कु. सात्त्विक सुधींद्र राव (वय ७ वर्षे) !

एकदा त्याने घरातील ५ आसंद्या व्यवस्थित लावल्या. आम्ही विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘आजोबा (प.पू. भक्तराज महाराज) आणि स्वामी आजोबा (परात्पर गुरु डॉक्टर) येणार आहेत.’’

रामनाथी आश्रमाचा परिसर, स्वागतकक्ष आणि ध्यानमंदिर पहातांना साधिकेला आलेल्या अनुभूती

ध्यानमंदिरातील गुरुपरंपरेची छायाचित्रे पहातांना ‘ते सगळे माझ्याकडे पाहून हसत आहेत’, असे मला वाटले.’ 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगापूर्वी आणि सत्संगात साधिकेला आलेल्या अनुभूती

‘मी सेवेनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. एकदा मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगाला बसण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत. 

‘सनातन प्रभात’ नियतकालिकासाठी मराठी लिखाणाचे कन्नडमध्ये भाषांतर करण्याची सेवा करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !

‘ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची सुवचने’, हा मराठी भाषेतील ग्रंथ कन्नड भाषेत भाषांतरित करतांना ‘प.पू. गुरुदेव आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवले. मी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची सुवचने अत्यंत आदराने वाचली. त्यांचे कन्नडमध्ये भाषांतर करतांना मला त्यांतील चैतन्य जाणवले.

घ्यावे लेकरा तुम्ही चरणी । 

‘मंगळुरू येथे गेल्यावर मला गुरु आणि देवता यांच्या अनुसंधानात रहाता येऊ लागले. दुसर्‍या दिवसापासून नामजप करतांना मला काही कविता सुचल्या. त्या गुरुचरणी अर्पण करण्याचा अल्पसा प्रयत्न !’

रामनाथी (गोवा ) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधकत्ववृद्धी शिबिरात’ सहभागी झालेल्या साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे नामजपादी उपाय केल्यानंतर माझ्या शरिराचा जडपणा आणि डोळ्यांची जळजळ उणावली. मला रात्री शांत झोप लागली आणि सर्व शरीर हलके झाले. मनातील विचारांची गर्दी न्यून होऊन माझा नामजप आपोआप होऊ लागला.’

पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपेआजी (वय ७६ वर्षे) यांनी केलेल्या पंचतत्त्वांच्या प्रयोगाच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती        

पू. आजींनी आश्रमाच्या समोरील टेकडीच्या दिशेने हात दाखवला असता ‘टेकडीच्या मागून कुणीतरी विजेरी दाखवत आहे’, असे दिसले आणि आकाशाकडे हात दाखवला असता आकाशात पांढरा उजेड दिसला.