‘वर्ष २०२४ मधील नवरात्रीच्या कालावधीत महिलांनी दमानीनगर, सोलापूर येथे दोन ठिकाणी देवीवर कुंकूमार्चन करण्याचे नियोजन केले होते.

१. देवीवर कुंकूमार्चन करण्यापूर्वी साधिकेने महिलांना भावजागृतीचा प्रयोग सांगणे आणि कुंकूमार्चन करतांना महिलांच्या डोळ्यांत भावाश्रू येऊन त्यांना आनंद होणे

‘एका ठिकाणी देवीवर कुंकूमार्चन करण्यापूर्वी मी तेथील महिलांना भावजागृतीचा प्रयोग सांगितला. तेथील महिलांनी ‘तुळजापूर येथेश्री भवानीमातेच्या मंदिरात जाऊन देवीवर कुंकूमार्चन करत आहोत’, असा भाव ठेवला. तेव्हा सगळ्यांना ‘प्रत्यक्ष तुळजापूर मंदिरात जाऊन देवीवर कुंकूमार्चन करत आहोत’, असे अनुभवता आले. प्रत्येक महिलेचा भाव जागृत होऊन तिच्या डोळ्यांत भावाश्रू आले. प्रत्येक महिलेला आनंद मिळाला. त्या महिलांनी सांगितले, ‘‘आम्ही प्रत्यक्ष तुळजापूर येथे गेल्यावरही आम्हाला असा भाव अनुभवता येत नाही.’’
२. देवीच्या चित्रावर वाहिलेले फूल नामजप करत देवीवर कुंकूमार्चन करत असतांना देवीच्या चरणांवर पडून तेथेच स्थिर रहाणे
आम्ही एके ठिकाणी देवीवर कुंकूमार्चन करत असतांनाश्री दुर्गादेवीचा १०८ वेळा नामजप करत होतो. तेव्हा देवीच्या चित्रावर ठेवलेले फूल आम्ही शेवटचे नाम घेत असतांना खाली पडले आणि ते फूल देवीच्या चरणांवर स्थिर झाले. ते जराही वेडेवाकडे झाले नाही. त्या वेळी ते पहाताक्षणीच एका ताईंचा भाव जागृत होऊन त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. तेव्हा सगळ्यांना पुष्कळ आनंद झाला. ‘देवी आपल्याला आशीर्वाद देत आहे’, असे उपस्थितांना अनुभवता आले.’
– सौ. स्नेहा भोवर, सोलापूर (२०.१०.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |