भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करण्याची पाकला भीती

देहलीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनावरून लक्ष वळवण्यासाठी भारत पुन्हा एकदा पाकमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’ करू शकतो, अशी भीती पाकमध्ये निर्माण झाली आहे.

(म्हणे) ‘तालिबानी पुरस्कार देऊन शिर्डी संस्थानचा सत्कार करू !’

३१ डिसेंबरपर्यंत फलक हटवला नाही, तर आम्ही पुन्हा शिर्डीत येऊन आंदोलन करू. त्या वेळी आम्ही शिर्डी संस्थानला ‘तालिबानी पुरस्कार’ देऊन सत्कार करू आणि त्यांच्या निर्णयाचा निषेध करू, अशी वल्गना तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.

केंद्र सरकारचा प्रस्ताव शेतकर्‍यांनी फेटाळला

१४ डिसेंबरला एकदिवसीय उपोषण आणि देशभरात धरणे आंदोलन करणार

‘पी.एफ्.आय.’वर बंदीसाठी गोव्यात ‘श्री परशुराम गोमंतक सेने’चे १६ डिसेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन

या संघटनेवर गोव्यात बंद घालण्याची मागणी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे ३ मासांपूर्वी केली होती; मात्र या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ‘पी.एफ्.आय.’च्या विरोधात आताच कारवाई न झाल्यास गोव्याचा पश्‍चिम बंगाल किंवा बिहार व्हायला वेळ लागणार नाही-श्री. शैलेंद्र वेलींगकर

देशभरातील शेतकर्‍यांचा बंद शांततेतच !

‘बंद’ म्हणजे स्वतःच्या मागण्यांसाठी देश आणि जनता यांना वेठीस धरून त्यांची सहस्रो कोटी रुपयांची हानी करणारा गुन्हाच होय ! अशा प्रकारे हानी करणे जनताद्रोहच होय ! सरकारनेही कुणावर अशा प्रकारचे आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, याकडे लक्ष द्यायला पाहिजे !

अकोला येथे भजन आणि कीर्तन यांसाठी वारकरी संघटनांचे आमरण उपोषण !

वारकर्‍यांकडून उपोषणस्थळी सरकारला सद्बुद्धी मिळावी, यासाठी संत गजानन महाराज यांच्या मूर्तीसमोर ‘सद्बुद्धी यज्ञ’ करण्यात आला. 

सातारा येथे राष्ट्रभक्तांच्या धाकाने शत्रूराष्ट्र चीनच्या नावाने चालू होणार्‍या हॉटेलचे नाव पालटले !

शत्रूराष्ट्राच्या नावाने चालू करण्यात येणार्‍या हॉटेलचे नाव पालटायला लावणार्‍या राष्ट्रप्रेमींचे अभिनंदन ! अशीच जागरूकता दाखवून राष्ट्राभिमान जोपासणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात ‘भारत बंद’ पाळून ठिकठिकाणी आंदोलन आणि फेरी यांचे आयोजन

कृषी विधेयकाच्या विरोधात महाराष्ट्रात आयोजलेला ‘भारत बंद’ चा तपशील येथे देत आहोत.

कृषी कायद्याच्या माध्यमातून देशात अराजक निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

विरोधाला विरोध म्हणून विरोधक कृषी कायद्याला विरोध करत आहेत.

सिलीगुडी (बंगाल) येथे पोलिसांच्या लाठीमारात भाजपच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू !

बंगालमध्ये पोलीस कधी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करतात का ? आणि केला, तर त्यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू होतो का ?