गांधीवादी नव्हे, प्रखर राष्ट्रवादी !

भारतानेही इस्रायलप्रमाणे प्रखर राष्ट्रवाद जोपासला असता, तर पाकव्याप्त काश्मीरचे सूत्र संयुक्त राष्ट्रापुढे नेण्याची वेळ आली नसती आणि आतापर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारताच्या अधीन असता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताने स्वत:ची प्रतिमा निश्चित सांभाळावी; परंतु ही प्रतिमा ‘गांधीवादी’ म्हणून नव्हे, तर ‘प्रखर राष्ट्रवादी’ असावी !

अमित शहा यांचे त्यागपत्र मागणे आवश्यक झाले आहे ! – भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट असल्याने आणि तरीही प्रतिदिन एका काश्मिरी हिंदूची गोळ्या झाडून हत्या केली जात असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यागपत्र देण्याची मागणी करणे आवश्यक झाले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जूनमध्ये संभाजीनगर दौरा !

संभाजीनगर येथे जूनमध्ये भाजपची मोठी बैठक होणार असून या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे, तसेच येथील महापालिकेच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

अमित शहा यांच्या दौर्‍यापूर्वी कोलकातामध्ये भाजप कार्यकर्त्याचा फासावर लटकवल्याच्या अवस्थेत सापडला मृतदेह !

भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांचा अशा प्रकारे संशयास्पद मृत्यू होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. एवढेच कशाला भाजपच्या अनेक नेत्यांवर यापूर्वीही जीवघेणी आक्रमणे झाली आहेत. ही रोखण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने धोरणात्मक पावले उचलणे हिंदूंना अपेक्षित आहे !

हिंदीला विरोध !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पूर्वाेत्तर राज्यांमधील शाळांमधील हिंदीला आवश्यक विषय बनवण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर आसामसहित अनेक राज्यांनी त्याला विरोध दर्शवण्यास प्रारंभ केला आहे.

समान नागरी कायदा राज्यघटनाविरोधी ! – ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा थयथयाट !

समान नागरी कायदा केल्यामुळे मुसलमानांना अनेक बायका करणे, अनेक मुले जन्माला घालणे आदी गोष्टी करण्यास मिळणार नसल्यानेच त्यांच्या संघटना याला विरोध करत आहेत !

श्रीराममंदिर, कलम ३७० नंतर आता समान नागरी कायद्याची वेळ आली आहे ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नागरिकत्व सुधारणा कायदा, श्रीराममंदिर, कलम ३७० आणि तिहेरी तलाक यांसारख्या सूत्रांवर निर्णय झाला. आता समान नागरी कायद्याची वेळ आली आहे

राज्यांतील नागरिकांनी एकमेकांशी संवाद साधतांना इंग्रजीऐवजी हिंदीचा वापर करावा ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

जेव्हा इतर भाषा बोलणारे राज्यांचे नागरिक एकमेकांशी संवाद साधतात, तेव्हा इंग्रजीत नव्हे,तर हिंदीत संवाद साधावा, असा सल्ला गृहमंत्री अमित शहा यांनी दिला.

५० वर्षे जुना आसाम-मेघालय सीमावाद संपुष्टात !

आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये गेल्या ५० वर्षांपासून चालू  असलेला सीमावाद अंततः संपुष्टात आला. येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांच्यात करार झाला.

(म्हणे) ‘काश्मीरमधील कथित युद्धाच्या संदर्भातील गुन्ह्यांसाठी भारताचे गृहमंत्री अमित शहा आणि सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे यांना अटक करावी !’

एखादे भारतीय विधी आस्थापन अशा प्रकारची मागणी पाकचे पंतप्रधान आणि सैन्यदलप्रमुख यांना त्यांनी आतंकवादी कारवाया केल्याच्या प्रकरणी अटक करण्यासाठी का करत नाही ?