नवी देहली – जेव्हा इतर भाषा बोलणारे राज्यांचे नागरिक एकमेकांशी संवाद साधतात, तेव्हा इंग्रजीत नव्हे,तर हिंदीत संवाद साधावा, असा सल्ला गृहमंत्री अमित शहा यांनी दिला. ते संसदीय अधिकृत भाषा समितीच्या ३७ व्या बैठकीत बोलत होते. इतर स्थानिक भाषांमधील शब्द स्वीकारून हिंदी भाषा अधिक लवचिक बनवावी, अशी सूचनाही त्यांनी केली.