मुंबई – भांडुप (पश्चिम) येथे तीन वेगवेगळे गट थोड्या थोड्या अंतरावर येशू ख्रिस्ताची पत्रके वाटत होते. स्थानिक हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद काटे यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी दोन्ही गटांच्या लोकांना यापासून रोखले; मात्र तिसर्या गटात एका तरुणीसमवेत १८ वर्षांखालील मुले-मुलीही होत्या. यांतील ख्रिस्ती मुलींनी ‘आम्ही पत्रके वाटणारच’, अशी भूमिका घेतली. तेव्हा पत्रके वाटणार्या मुलींना ‘तुम्ही पत्रके आम्हाला द्या आणि येथून शांततेत निघून जा’, असे सांगूनसुद्धा ख्रिस्ती मुलींनी ऐकले नाही. या वेळी परिसरात मोठी गर्दी जमा झाली आणि शेवटी वाद होऊन गटाने पत्रके परत करून माघार घेतली. (धर्मांतराची पत्रके वाटणार्यांना रोखणारे हिंदुत्वनिष्ठ प्रमोद काटे यांचा स्तुत्य प्रयत्न ! – संपादक)
प्रमोद काटे म्हणाले, ‘‘पत्रके वाटण्याची पूर्व अनुमती या तिन्ही गटांनी काढली होती का ?, याचीही चौकशी व्हायला हवी. यासह लहान मुलांना समवेत घेऊन असे धर्मांतराचे हेतू बाळगून पत्रके वाटणे योग्य नाही, तसेच या पत्रकातही येशू आजार बरे करतो, अशी अंधश्रद्धा पसरवण्यात येत आहे, हे पूर्णतः चुकीचे आहे.’’
संपादकीय भूमिकाख्रिस्त्यांचा वाढता उद्दामपणा रोखण्यासाठी धर्मांतरविरोधी कायदा होणे आवश्यक आहे ! |