तुर्कस्तान आणि पाकिस्तान यांच्याशी संबंधित विधी आस्थापनाची ब्रिटनकडे मागणी
|
लंडन (ब्रिटन) – काश्मीरमधील कथित युद्धाच्या संदर्भातील गुन्ह्यांसाठी भारताचे गृहमंत्री अमित शहा आणि सैन्यदलप्रमुख जनरल मनोज नरवणे यांना अटक करावी, अशी मागणी मागणी लंडनमधील ‘स्टोक व्हाईट’ या विधी आस्थापनाने केली आहे. या संदर्भात या आस्थापनाने काश्मीरमध्ये वास्तव्यास असलेल्या २ सहस्र लोकांचा जबाब असलेला एक अहवाल लंडन पोलिसांना दिला आहे. ‘हे जबाब म्हणजे काश्मीरमध्ये चालू असलेल्या युद्धाच्या संदर्भातील गुन्ह्यांचा आणि हिंसेचा पुरावा आहे’, असा दावा या आस्थापनाने केला आहे. हे आस्थापन तुर्कस्तानी अधिकार्यांशी संबंधित असून ते पाकिस्तानच्या वतीने काम करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या आस्थापनाचे कार्यालय लंडनमध्ये, तसेच तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथे आहेत. ‘ब्रिटनच्या कोणत्याही प्राधिकरणाने या प्रकरणी भारतीय उच्चायोगाशी संपर्क साधलेला नाही’, अशी माहिती भारतीय अधिकार्यांनी दिली.
#UK-based law firm Stoke White filed an application with the #British police to arrest #India’s army chief General Manoj Mukund Naravane and #Indian Home Affairs Minister Amit Shah over their alleged roles in war crimes (torture, kidnapping and killing of civilians) in #Kashmir. pic.twitter.com/Jp0eBZzMwS
— TRT World Research Centre (@TRTWorldRC) January 19, 2022