२५ जूनपासून राज्यभरात ‘नशामुक्त महाराष्ट्र अभियान’ !
येत्या २५ जूनपासून राज्यभर ‘नशामुक्त महाराष्ट्र अभियान’ राबवण्यात येणार असून त्यात सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटना यांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री अधिवक्ता आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.