झोपेचे सोंग कशाला ?

‘उचलली जीभ लावली टाळ्याला’, अशी मोदी यांची प्रतिमा नाही. त्यामुळे मोदी यांनी केलेल्या टीकेनंतर पवार यांनी स्वत:च्या राजकारणाविषयी आत्मचिंतन केले पाहिजे.

पुणे येथे कृषी आयुक्तालय इमारतीच्या बांधकामासाठी २२५ वृक्ष तोडणार !

झाडे तोडू नयेत यासाठी पर्यावरणप्रेमींना विरोध करावा लागत आहे, यातून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होते !

ए.पी.एम्.सी. परिसरातील जागा अनधिकृतपणे बळकावणार्‍या व्‍यावसायिकांवर कारवाई !

सामासिक जागा (मार्जिनल स्‍पेस) बळकावणार्‍या ५० हून अधिक मोठ्या व्‍यावसायिकांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या वतीने कारवाई करण्‍यात आली.

शेतीच्‍या यांत्रिकीकरणासाठी राज्‍यशासन करणार ब्राझीलमधील शेतीचा अभ्‍यास

ब्राझीलमधील शेतीच्‍या यांत्रिकीकरणाचा अभ्‍यास करून त्‍याप्रमाणे महाराष्‍ट्रात शेतीची उत्‍पादकता वाढावी, यासाठी राज्‍यातील कृषी विद्यापिठांच्‍या संशोधकांना ब्राझील येथे पाठवण्‍याचा निर्णय महाराष्‍ट्र शासन करत आहे.

मुख्‍यमंत्र्यांचे आदेश न्‍यायालयाकडून रहित !

नाशिक कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीमधील कथित धान्‍यवाटप घोटाळा आणि गाळे विक्रीत १ कोटी १६ लाख रुपयांच्‍या आर्थिक हानी प्रकरणी यापूर्वी मुख्‍यमंत्र्यांनी दिलेले आदेश उच्‍च न्‍यायालयाने रहित ठरवले आहेत. याविषयी ‘पणनमंत्र्यांनी पुन्‍हा सुनावणी घ्‍यावी’, असे आदेशही न्‍यायालयाने २४ ऑगस्‍ट या दिवशी दिले आहेत. 

मंत्री शंभूराज देसाई यांच्‍या तालुक्‍यातच कृषी विभागातील ५० टक्‍के पदे रिक्‍त !

एकीकडे तरुणवर्ग नोकरीसाठी वणवण फिरतो आहे, तर दुसरीकडे पदे रिक्‍त रहात आहेत, हे अनाकलीन आणि गंभीर आहे. पदे रिक्‍त राहिल्‍यामुळे कामकाजावर होणार्‍या परिणामाचे दायित्‍व कुणाचे ?

राज्‍यातील ९ जिल्‍ह्यांत अनधिकृत विनापरवाना कापूस बियाण्‍याची विक्री !

शेजारील राज्‍यातून आणून महाराष्‍ट्रात बियाण्‍यांची विक्री केली जाते. अनेक ठिकाणी घरांमध्‍ये साठा करून गुपचुप विक्री करण्‍यात येते. कृषी विभागाच्‍या गुणवत्ता नियंत्रण पथकांच्‍या वतीने अशा चोरट्या विक्रेत्‍यांवर कारवाई करण्‍यात येत आहे.

सिंधुदुर्ग : डिगस येथे बांगलादेशी नव्हे, तर बंगाल, बिहार आणि उत्तरप्रदेश राज्यांतील नागरिकांच्या अर्जांचा समावेश

बांगलादेशच्या सीमेला जोडलेल्या राज्यांत बांगलादेशींनी घुसखोरी केली आहे. तेथून ते देशात इतरत्र स्थायिक होतात आणि भ्रष्टाचारी प्रशासकीय अधिकारी लाच घेऊन त्यांना सुविधा पुरवतात. त्यामुळे या लोकांचा ‘बांगलादेशी’ नागरिक असा उल्लेख बातम्यांमध्ये झाला असल्यास तो पूर्णतः चुकीचा कसा ठरेल ?

लातूर येथील १६ कृषी केंद्रांवर कारवाई !

कृषी विभागाने केलेल्‍या नियमांचे पालन न करणार्‍या २ कृषी केंद्राचे परवाने कायमस्‍वरूपी रहित करण्‍यात आले असून १४ केंद्राचे परवाने निलंबित करण्‍यात आले आहेत. येथील कृषी विभागाने ही कारवाई केली आहे.

८५० रुपयांचे कापसाचे बियाणे तब्‍बल २ सहस्र ३०० रुपयांना विकून शेतकर्‍यांची फसवणूक चालू !

राज्‍यात बनावट बियाणे आणि वाढीव दराने त्‍यांची विक्री करणार्‍या लोकांविरोधात धाडसत्र चालू आहे. शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या लोकांना सोडणार नाही, अशी भूमिका कृषीमंत्री अब्‍दुल सत्तार यांनी स्‍पष्‍ट केली आहे