दोन निष्पाप हिंदुत्वनिष्ठांची निर्दोेष मुक्तता झाल्याप्रकरणी आरोपींचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा अधिवक्त्यांच्या हस्ते सत्कार !  

गुजरात येथील बेस्ट बेकरी प्रकरणातील हिंदुत्वनिष्ठ आरोपींच्या बाजुने खटला लढवून त्यांचे निर्दोषत्व उत्कृष्टपणे सिद्ध केल्याविषयी इचलकरंजी येथील अधिवक्त्यांच्या वतीने हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष तथा अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

पोलिसांनी शिकवल्‍यानुसार पंच नितीन जाधव साक्ष देत आहेत ! – अधिवक्‍ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्‍यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

संशयित आरोपीच्‍या अधिवक्‍त्‍यांनी समीर गायकवाड यांच्‍या अटकेचा पंचनामा करणारे पंच नितीन जाधव यांची उलट तपासणी घेतली. त्‍या वेळी पंच नितीन जाधव यांनी विचारलेल्‍या प्रश्‍नांना उत्तर न देता वेळकाढूपणा करत होते, तसेच एकाच प्रश्‍नाची वेगवेगळी उत्तरे देत होते.

न्यायव्यवस्थेमध्ये कर्मफलन्याय सिद्धांताचा समावेश अत्यावश्यक ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

एकाच प्रकारचा गुन्हा असूनही गुन्हेगारांना वेगवेगळी शिक्षा कशी होते ? यामागे कर्मफलसिद्धांत आहे का ? जेव्हा एखाद्याकडून बलात्कारासारखा गुन्हा होतो, तेव्हा त्यामागे ‘काम’ आणि ‘क्रोध’ या षड्रिपूंमधील दोषांचा समावेश असतो.

चेन्नई येथील शिवाचारयार ट्रस्टचे विश्‍वस्त श्री. टी. एस्. साम्बमूर्ती कलिदोस यांचा सन्मान !

वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या चौथ्या दिवशी म्हणजे १९ जून या दिवशी चेन्नई येथील शिवाचारयार ट्रस्टचे विश्‍वस्त श्री. टी. एस्. साम्बमूर्ती कलिदोस यांचा सत्कार करतांना चेन्नई येथील सनातनचे साधक श्री. बाळाजी कोल्ला.

नक्षलवादी हेच साम्यवादी आणि साम्यवादी हेच नक्षलवादी आहेत, हे न सांगणे, हाच वैचारिक आतंकवाद ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

आम्हाला कुणाच्या हत्येचे समर्थन करायचे नाही. नास्तिकतावाद्यांच्या हत्येनंतर हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवले जाते; परंतु ‘साम्यवाद्यांनी किती जणांना मारले ?’, हा प्रश्‍न कुणी विचारेल का ?

‘द रेशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाचे लोकार्पण !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे लोकार्पण झाले. या वेळी व्यासपिठावर पुस्तकाचे लेखक डॉ. अमित थडानी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती हे उपस्थित होते.

संयुक्त राष्ट्रांकडून हिंदु महिलांशी भेदभाव होत असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी ट्वीट करून विषयाला वाचा फोडली !

लेखापरीक्षण अहवाल सादर न करणार्‍या क्रीडा अधिकार्‍यांना तत्परतेने तो सादर करण्याचा आदेश !

अनेक क्रीडासंकुले आणि क्रीडा परिषदा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल शासनाला सादर करत नाहीत. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार किंवा भ्रष्टाचार होण्याची शक्यता वर्तवत हिंदु विधीज्ञ परिषदेने राज्याच्या क्रीडा संचालकांकडे लेखी तक्रार केली होती.

११ वर्षांनंतरही दंगलीच्या हानीभरपाईची वसूली नाही !

ही दंगल ज्या सरकारच्या काळात झाली, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संबंधितांनाही तत्परतेने कार्यवाही न केल्याप्रकरणी आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा मिळायला हवी !

दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी हत्याकांडांच्या अन्वेषणातील सावळा गोंधळ सर्वांपर्यंत पोचायला हवा ! – शेफाली वैद्य, सुप्रसिद्ध लेखिका

५ मे या दिवशी पुणे येथील अंबर कार्यालयात ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ या डॉ. अमित थडानी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रसिद्धीमाध्यमांमुळेच हे अन्वेषण भरकटले, कारण प्रसिद्धीमाध्यमेच न्यायाधिशांची भूमिका बजावतात, असे शेफाली वैद्य या वेळी म्हणाल्या.