दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी हत्याकांडांच्या अन्वेषणातील सावळा गोंधळ सर्वांपर्यंत पोचायला हवा ! – शेफाली वैद्य, सुप्रसिद्ध लेखिका
५ मे या दिवशी पुणे येथील अंबर कार्यालयात ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ या डॉ. अमित थडानी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रसिद्धीमाध्यमांमुळेच हे अन्वेषण भरकटले, कारण प्रसिद्धीमाध्यमेच न्यायाधिशांची भूमिका बजावतात, असे शेफाली वैद्य या वेळी म्हणाल्या.