हिंदु विधीज्ञ परिषदेच्या तक्रारीनंतर क्रीडा संचालनालयाची कार्यवाही !
मुंबई – शासनाकडून निधी घेऊनही राज्यातील अनेक क्रीडासंकुले आणि क्रीडा परिषदा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल शासनाला सादर करत नाहीत. काही क्रीडा समित्यांकडून तर हे मागील काही वर्षांपासून होत आहे. त्यामुळे यामध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार किंवा भ्रष्टाचार होण्याची शक्यता वर्तवत हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी याविषयी राज्याच्या क्रीडा संचालकांकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची नोंद घेऊन क्रीडा संचालनालयाने राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक, तसेच जिल्हा आणि तालुका पातळीवरील क्रीडा अधिकारी यांना पत्र पाठवून त्यांना तत्परतेने तो सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
हिंदु विधीज्ञ परिषदेचे प्रसिद्धीपत्रक –
१. ‘जोपर्यंत लेखापरीक्षण अहवाल आणि तत्सम कागदपत्रे सादर केली जात नाहीत, तोपर्यंत क्रीडा परिषदा अन् क्रीडासंकुले यांना शासकीय निधी देण्यात येऊ नये’, असे हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी क्रीडा संचालकांना लिहिले होते.
२. याची नोंद घेत क्रीडा संचालनालयाने अधिवक्ता इचलकरंजीकर यांच्या तक्रारीची प्रत राज्यातील सर्व क्रीडा अधिकार्यांना पाठवून या सूत्रावर गांभीर्याने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
३. क्रीडासंकुलाविषयी लेखापरीक्षण अहवाल अद्ययावत् ठेवणे आणि फेरफार अहवाल अथवा तत्सम कागदपत्रे साहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे सादर करणे याचे दायित्व विभागीय संचालक, जिल्हा क्रीडा अधिकारी, तालुका क्रीडा अधिकारी यांसह संबंधित अधिकार्यांचे आहे, हे राज्याचे क्रीडा संचालनालयाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे यांनी परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व क्रीडा अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले. ‘हिंदु विधीज्ञ परिषदेच्या पत्रानुसार कारवाई करावी. त्याचा आढावा १ मासाने घेण्यात येईल’, असेही कांबळे यांनी परिपत्रकात म्हटले आहे.


‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !