संयुक्त राष्ट्रांकडून हिंदु महिलांशी भेदभाव होत असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी ट्वीट करून विषयाला वाचा फोडली !

मुंबई – संयुक्त राष्ट्रांची संघटना असलेल्या महिलांवरील भेदभावविरोधी समितीने तिच्या संकेतस्थळावर प्रातिनिधिक छायाचित्र म्हणून ३ हिंदु महिलांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. (या माध्यमातून हिंदु महिलांवर भेदभाव होत असल्याचे संयुक्त राष्ट्रांना सुचवायचे आहे.) ‘हा स्वत:मध्येच एक भेदभाव आहे’, अशी टीका हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी ट्वीट करून केली. (जगात मुसलमान आणि ख्रिस्ती महिलांना भेदभावाची वागणूक दिली जात नाही का ? ‘हिंदु धर्म स्त्रीविरोधी आहे’, हे रंगवण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटना कशा प्रकारे आटापिटा करतात, हेच यातून दिसून येते ! – संपादक)

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

‘हे थांबले पाहिजे’, असेही त्यांनी म्हटले असून केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने यावर कारवाई करण्याचे आवाहनही त्यांनी ट्वीटद्वारे केले आहे.

संपादकीय भूमिका

संयुक्त राष्ट्रे ‘शांतता, परस्पर आदर आणि समानता’ या तत्त्वांवर कार्य करत असल्याचे एकीकडे म्हणते, तर दुसरीकडे हिंदूंना अपमानित करते. यातून संयुक्त राष्ट्रांचा हिंदुद्वेष लक्षात येतो. परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी यावरून संयुक्त राष्ट्रांना जाब विचारला पाहिजे !