११ वर्षांनंतरही दंगलीच्या हानीभरपाईची वसूली नाही !

  • मुंबई येथे रझा अकादमीने घडवलेल्या दंगलीचे प्रकरण

  • प्रक्षोभक भाषण करणार्‍यांना अटक नाही !

  • आरोपींच्या साक्षी नोंदवणे शेष

मुंबई येथे रझा अकादमीने आझाद मैदानात ११ ऑगस्ट २०१२ या दिवशी घडवलेली दंगल

मुंबई – रझा अकादमीच्या धर्मांध कार्यकर्त्यांनी ११ ऑगस्ट २०१२ या दिवशी येथील आझाद मैदानात मोठी दंगल घडवली होती. म्यानमार येथे मुसलमानांवर कथित अत्याचार केल्याच्या निषेधासाठी तेथे मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने रझा अकादमीच्या ६० दंगलखोरांकडून ३६ लाख रुपयांची वसुली करण्याचा आदेश दिला; पण याला ११ वर्षे होऊनही यांतील एक रुपयाही वसूल केलेला नाही, असे समजते. (धर्मांधांच्या दहशतीमुळे पोलीस आणि प्रशासन त्यांच्याकडून हानीभरपाई करण्यासाठी कचरतात, असे समजायचे का ? – संपादक) हे वृत्त हिंदुस्थान पोस्ट’ वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे.

१. हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून झालेली हानी आणि त्याची वसुली यांविषयीची माहिती मागितली. त्यावर मुंबई जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार ६० जणांवर गुन्हे नोंद करून दंगलखोरांकडून एकूण ३६ लाख ४४ हजार ६८० रुपयांची भरपाई करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांना देण्यात आला होता. या दंगलीत पोलीस विभागाची २५ लाख ७८ सहस्र ३७९ रुपये, बेस्टची ३ लाख ४५ सहस्र ३०७ आणि अग्निशमन दलाची ३ लाख १५ सहस्र ३७ रुपये हानीभरपाई दंगलखोरांकडून वसूल करून द्यावी’, असे निर्देश देण्यात आले होते.

२. पोलीस वसुलीसाठी संबंधित दंगलखोरांनी दिलेल्या पत्त्यांवर जातात; मात्र दंगलखोर तिथे रहात नसल्याचे समजते. (देशविघातक डावपेचांत हुशार असणारे दंगलखोर मुसलमान ! – संपादक) अशा प्रकारामुळे एक रुपयाचीही वसुली झालेली नाही. (यातून पोलीस प्रशासनाचेच एकप्रकारे हसे झाले, असे म्हणता येईल ! – संपादक)

३. या प्रकरणातील सर्वच आरोपी जामिनावर सुटले असून मोकाट फिरत आहेत.

४. या प्रकरणातील ८६० साक्षीदारांच्या साक्षी नोंदवणे अद्यापही शेष आहे. त्यांतील एकाही साक्षीदाराची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आलेली नाही. (हिंदूंच्या विरोधातील प्रकरणात लगेचच साक्षी घेतल्या जातात आणि अटकेची कारवाईही तत्परतेने होते; पण हे प्रकरण जाणूनबुजून दाबण्यात आले आहे’, असे कुणी म्हटल्यास चुकीचे काय ? – संपादक)

५. रझा अकादमीचे मौलाना नियामत नूरी, मौलाना अख्तर अली, मौलाना अमानुल्ला बरकाती, मौलाना गुलाब अब्दूर कादरी, माजी पोलीस अधिकारी समशेर खान पठाण यांच्यासह १७ जणांनी व्यासपिठावरून चिथावणीखोर भाषणे केली होती. त्यांच्यावर पोलिसांनी तेव्हा गुन्हे नोंद केले होते; पण त्यातील एकालाही अटक करण्याचे पोलिसांचे आजवर धाडस झाले नाही. (एरव्ही हिंदूंनी जरा कुठे धर्म, संस्कृती यांविषयी प्रक्षोभक तर नव्हेच; पण प्रबोधनपर भाषण केले, तरी त्यांना लगेच कारागृहात डांबण्यात येते; पण ही तत्परता मुसलमानांच्या संदर्भात दाखवली जात नाही, हा दुटप्पीपणा आणि मुसलमानांविषयीचा उमाळा लक्षात घ्या ! – संपादक) त्यामुळे हे सर्व आरोपी मोकाट फिरत आहेत.

६. महिला पोलिसांशी गैरवर्तन करणारे धर्मांधही मोकाटच आहेत. (असे होणे हा समस्त स्त्रीवर्गाचा अवमानच आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • दंगलीच्या ११ वर्षांनंतरही कारवाई न होणे हे निधर्मी लोकशाही, तसेच कायदा-सुव्यवस्था यांच्यासाठी लाजिरवाणेच आहे. हा प्रकार म्हणजे भारताची इस्लामीकरणाकडे होणारी वाटचालच होय ! हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अनिवार्य आहे !
  • ही दंगल ज्या सरकारच्या काळात झाली, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संबंधितांनाही तत्परतेने कार्यवाही न केल्याप्रकरणी आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा मिळायला हवी !