गुटखा विक्री प्रकरणी नवी मुंबईतील बाजार समितीतील ५ पान टपर्‍या सील

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी मुंबई – कृषी उत्पन्न बाजार समितीतील ५ पान टपर्‍यांवर अन्न – औषध प्रशासन विभागाकडून गुटखा विक्रीच्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. वरील कारवाई प्रकरणी ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाचही बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री केली जाते. येथे १० गोणी गुटखा दिवसाला विकला जात असल्याची चर्चा होती. (गुटखा विक्रीवर बंदी असतांना कृषी उत्पन्न बाजार समितीत इतकी वर्षे एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होतेच कशी ? – संपादक)

बाजारसमितीच्या विकास शाखेकडून वाटप करण्यात आलेल्या पान टपर्‍यांवर सर्रास गुटखा विकला जात होता. याविषयी बाजार समितीच्या प्रशासनाला तक्रार देऊनही त्यावर कारवाई केली जात नसल्याची चर्चा आहे. यामध्ये मुख्य सूत्रधार राजन गुप्ता उपाख्य मुन्ना याचे नाव पुढे आले आहे. गुप्ता यांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. गुप्ता हे शिवसेनेच्या उत्तर भारतीय विभाग बेलापूर विधानसभा उपशहर संघटक पदावर होते.