
मुंबई – माघी गणेशोत्सवामध्ये राज्य सरकारने ज्यांना शक्य असेल त्यांनी घरीच श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, असे नियमावलीत स्पष्ट केले आहे. सरकारने माघी गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना घोषित केल्या आहेत. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळून उत्सव साजरा करावा, असे आदेश सरकारने दिले आहेत.
नियम कोणते आहेत ?
१. विसर्जनाला केवळ पाच कार्यकर्त्यांना अनुमती असेल. मंडप उभारणीसाठी पालिका अथवा स्थानिक प्रशासन यांची पूर्वानुमती घेणे आवश्यक आहे.
२. मंडप मर्यादित आकाराचा असावा, आगमन-विसर्जन मिरवणुका काढता येणार नाहीत, सार्वजनिक मूर्तीची उंची ४ फूट, तर घरगुती मूर्तीची उंची २ फूट असावी, शक्य असल्यास धातूच्या किंवा संगमरवरी मूर्तीचे पूजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
३. मंडपात एका वेळी १० पेक्षा अधिक कार्यकर्ते आणि १५ पेक्षा अधिक भाविक नसावे.
४. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी सामाजिक उपक्रम, रक्तदान किंवा आरोग्य शिबिर अशा कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे.
५. ऑनलाईन किंवा केबल नेटवर्कच्या माध्यमातून दर्शनाची सोय करावी, मंडपात सामाजिक अंतराचे पालन करावे, वेळोवेळी मंडपाचे निर्जंतुकीकरण करावे, येणार्या भाविकांची तापमान पडताळणी, मुखपट्टीचा वापर, स्वच्छतेचे नियम आदींविषयी दक्षता बाळगावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था