वणी विभागात एकही शासकीय कापूस खरेदी केंद्र चालू नाही
या विभागातील एकही शासकीय कापूस खरेदी केंद्र चालू झाले नाही; त्यामुळे व्यापार्यांकडून शेतकर्यांची सर्रास लूट होत आहे. आधीच परतीच्या पावसाने हतबल झालेला शेतकरी, त्यात बोंडअळीने ग्रस्त आणि तशातून निघालेल्या कापूस खरेदीसाठी शासकीय केंद्र नाही, अशी दैनावस्था शेतकर्यांची झाली आहे.