मुंबई, १५ सप्टेंबर (वार्ता.) – विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी म्हणजे १५ डिसेंबरला विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधीमंडळाच्या इमारतीच्या पायर्यांवर आंदोलन केले. या वेळी राज्यातील महिलांवरील वाढती आक्रमणे, मराठा आरक्षणाचे प्रलंबित सूत्र, शेतकर्यांना हानीग्रस्त पिकांची हानी न मिळणे या सूत्रांवरून विरोधकांनी महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणा दिल्या. विरोधी पक्षाच्या आमदारांनी हातात फलक धरून सत्ताधारी पक्षाचा निषेध केला.